महाराष्ट्र गीत
- गोविंदाग्रज
मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा! प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।धृ.।।राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा।।अंजनकांचनकरवंदीच्या काटेरी देशा।बकुलफुलांच्या, प्राजक्तीच्या दळदारी देशा।।भावभक्तिच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा।शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दाच्या देशा।ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणवरी नाचते करी।।जोडी इहपरलोकांसी व्यवहारापरमार्थासी वैभवासी वैराग्यासी।।जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा।।प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।1।।