testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

- कवी सुरेश भट

वेबदुनिया|

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामानात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी


यावर अधिक वाचा :

बॉबी डार्लिंगच्या पतीची तिहार जेलमध्ये रवानगी

national news
चित्रपट कलाकार बॉबी डार्लिंगचा पती रमणिक शर्माला दिल्ली पोलिसाांनी अटक केली असून त्याची ...

येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला

national news
कर्नाटक विधानसभेत भाषण देताना भावुक होऊन येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला. येडियुरप्पा ...

म्हणून खासदार प्रितम मुंडे प्रचारापासून अलिप्त

national news
बीड-लातूर-धाराशिव स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीचा ज्वर अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ...

अधीक्षक अभियंता म्हणतो, मी श्रीविष्णूंचा अवतार

national news
गुजरातमधील एका अधिकाऱ्याला तो साक्षात श्रीविष्णूंचा अवतार असल्याचा साक्षात्कार झाला आहे. ...

एअरटेल - अमेझॉनचा करार, मिळणार २,६००चा कॅशबॅक

national news
एअरटेल आणि अमेझॉन इंडियाने मिळून ४ जी स्मार्टफोन खरेदीवर कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी ...

डिसेंबर 2019 पर्यंत भारतात 5 जी सेवेची शक्यता

national news
येत्या काही दिवसात 5 जीचे निकष निश्चित करण्याचा ट्रायचा प्रयत्न करणार असून डिसेंबर 2019 ...

फेसबुकवर अमिताभ बच्चन यांचा नवा रेकॉर्ड

national news
महानायक अमिताभ बच्चन यांनी अजून एक रेकॉर्ड केला आहे. नुकताच त्यांनी फेसबुकवर ३ कोटी ...

पेटीएमचे नवे फिचर, मोठ्या रकमेचा व्यवहार शक्य

national news
डिजीटल वॉलेट कंपनी पेटीएमने आपल्या ग्राहकांसाठी My Payments नावाचं एक नवं फिचर आणलं आहे. ...

नोकिया 6.1 स्मार्टफोनची लिस्टिंग

national news
नोकिया ब्रँडची मालकी असणार्‍या एचएमडी ग्लोबल कंपनीने भारतीय बाजारपेठेत गेल्या वर्षी ...

फेसबुकने सुमारे तीन कोटी पोस्ट केल्या डिलीट

national news
फेसबुकने 2018च्या पहिल्या तीन महिन्यातील जवळपास तीन कोटी पोस्ट डिलीट केल्या आहेत. ...