testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

केटरिंगमधील करिअरसंधी

catring
वेबदुनिया|
WD
ज्यांना नोकरी ऐवजी स्वतंत्र व्यवसाय करण्याची इच्छा असते अशा लोकांसाठी केटरिंग हा व्यवसायाचा उत्तम पर्याय आहे. लग्न, साखरपुडा, बारसे, एकसष्ठी, पंचाहत्तरी, लग्नाचा वाढदिवस यासारख्या कार्यक्रमात जेवण कसे असते यावरच त्या कार्यक्रमाचे यश अवलंबून असते. पाहुण्यांना जर जेवण आवडले तर तो यजमानांवर खुष होत असतो. अशा समारंभातील जेवणाची चव पाहुणे मंडळी कधीच विसरत नसतात.

आपल्याला खाण्यापिण्याचे पदार्थ तयार करण्याची आवड असेल किंवा तुमच्याकडे व्यवस्थापन कौशल्य असेल तर तुम्ही उत्तम केटरिंग व्यावसायिक बनू शकता. केटरिंगचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता लागत नाही. तुमच्याकडे अनुभव आणि व्यवस्थापन कौशल्य असले पाहिजे. केटरर होण्यासाठी हिच पात्रता आहे. छोटे छोटे कार्यक्रम करीत तुम्ही या व्यवसायाचा अनुभव मिळवू शकता. त्यासाठी घर आणि ऑफिसमध्ये डबे देण्याच्या व्यवसायापासून तुम्हाला सुरुवात करता येऊ शकेल. डबे देण्याच्या व्यवसायातून तुम्हाला किती लोकांसाठी किती अन्नपदार्थ लागतात, त्यासाठी साहित्य किती लागते याचा अंदाज येऊ शकतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या पदार्थांची चव कशी असावी याचाही अंदाज डबे पोहोचवण्याच्या व्यवसायातून येऊ शकतो.
या व्यवसायातून तुम्हाला दहा पंधरा लोकांसाठी घरपोच जेवण पोहोचवण्याचा व्यवसाय सुरू करता येतो. अनेकदा दोन तीन कुटुंबात मिळून जेवणाचा बेत आखला जातो. जेवणासाठी हॉटेलमध्ये जाण्याऐवजी घरपोच जेवण मिळत असेल तर त्याला प्राधान्य दिले जाते. पुण्यासारख्या शहरात केळवणासारख्या कार्यक्रमाला डबे मागवण्याची प्रथा रुढ होत आहे. या पद्धतीतून केटरर लोकांना आपला व्यवसाय वाढवता येऊ शकतो. व्यवसायाची सुरुवात लग्न समारंभा सारख्या कार्यक्रमातून केली तर गडबड उडण्याची शक्यता असते. कारण आपल्या जवळ एवढ्या मोठ्या संख्येने येणा-या लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचा अनुभव नसतो. मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करण्यासाठी गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात करावी लागते. छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू करून त्यातील उत्पन्न बाजूला काढून तुम्ही मोठ्या व्यवसायाची पायाभरणी करू शकता. केटरिंगचा व्यवसाय वाढवायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी बँकेकडून कर्ज घेण्याची सोय उपलब्ध आहे. सरकारी तसेच सहकारी बँका केटरिंग व्यवसायासाठी २५ हजारापासून २५ लाखापर्यंत कर्ज देतात.
लघुउद्योग योजनेअंतर्गत किंवा पंतप्रधान स्वयंरोजगार योजने अंतर्गत तुम्ही सरकारी बँकांकडे या व्यवसायासाठी कर्जाची मागणी करू शकता. त्यासाठी तुम्हाला या व्यवसायातील उलाढालीची अधिकृत कागदपत्रे तयार ठेवण्याची आवश्यकता असते. केटरिंग व्यवसायात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला ग्राहकांबरोबर वैयक्तिक संबंध निर्माण करावे लागतात. तुमचे ग्राहकांबरोबरचे संबंध चांगले असतील तर त्याचा फायदा व्यवसाय वृद्धीसाठी होऊ शकतो. जर ग्राहक तुमच्या जेवणाच्या चवीवर मनापासून खूष झाला तर तो तुमची शिफारस मित्रमंडळींकडे तसेच नातेवाईकांकडे करू शकतो. म्हणून तुमच्याकडे येणारा प्रत्येक ग्राहक तुमच्या अन्नपदार्थांच्या चवीवर खूष झाला पाहिजे. यासाठी तुमच्या अन्नाचा दर्जा उत्तम असणे आवश्यक आहे. ग्राहकांवर तुमच्या सेवेची छाप पाडण्यासाठी अन्नाच्या उत्तम चवीबरोबरच तुमच्या कर्मचा-यांचे कपडे चांगले असणे आवश्यक आहे. यासाठी सर्व कर्मचा-यांना समान ड्रेस दिला तर तो उपयुक्त ठरतो. चांगल्या कपड्यांबरोबरच कर्मचारी स्वच्छ दिसणेही जरूरीचे आहे. विशेषतः वाढपी लोकांच्या बाह्य रुपाकडे विशेष लक्ष द्यावे लागते. तुम्ही घरपोच सेवा देत असाल तर या सेवेसाठी ज्या कर्मचा-यांना पाठवले जाते ते टापटिप असतील याकडे लक्ष द्या. कोणत्याही स्थितीत जेवणाला उशिर होणार नाही याची काळजी घ्या. तुमच्या मेन्यूमध्ये नवनवीन पदार्थ असतील याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. आपल्याकडील उपलब्ध मनुष्यबळाचा पुरेपूर वापर कसा करून घेता येईल याचे कौशल्य तुम्हाला आत्मसात करावे लागते. अर्थात हे कौशल्य अनुभवानेच प्राप्त होते.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

सफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा

national news
आजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...

आंबट-गोड भेंडीची भाजी

national news
सर्वप्रथम भेंड्या धुऊन स्वच्छ फडक्याने कोरड्या पुसून घ्याव्या, नंतर त्या चिराव्यात. नंतर ...

संघटितपणाचे महत्त्व

national news
एक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाईकरून आणि स्वतः चांगले जीवन ...

काही उपयोगाच्या आरोग्य टिप्स

national news
आवळा चुर्ण व आवळ्याचे पदार्थ त्वचेतील शुष्कता कमी करतात. दहा ग्रॅम सुंठ घेऊन कांजीसोबत ...

हाडांच्या समस्यांपासून दूर राहायचे असेल तर ग्रीन टी प्या

national news
खरंतर ग्रीन टी पिण्याचे अनेक ङ्खायदे आहेत. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, ग्रीन टी ...