शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By

भाभा अणु संशोधन केंद्रात परिचारिका, ड्रायव्हरसह अनेक रिक्त पदे अर्ज करा

भाभा अणु संशोधन केंद्र किंवा भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर (BARC) ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर नर्स, ड्रॉयव्हर, स्टायपेंडरी ट्रेनी आणि इतर विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत किंवा या पूर्वी barc.gov.in या संकेत स्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. संस्थेकडून एकूण 63 रिक्त पद भरण्यासाठी मोहीम राबविली जात असून  या रिक्त पदांपैकी थेट भरती साठी 53 पदे आणि स्टायपेंडरी ट्रेनी साठी 10 पदे रिक्त आहे. 
 
शैक्षणिक पात्रता  - 
वैद्यकीय / वैज्ञानिक अधिकारी / ई(परमाणु चिकित्सा): उमेदवाराला कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून एमएस / एमडी किंवा समकक्ष (परमाणु चिकित्सा) असणे आवश्यक आहे. तसेच पदवी पूर्ण झाल्यावर चार वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. 
 
तांत्रिक अधिकारी - उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून 60 % गुणांसह एम.एस.सी आणि 50%गुणांसह डीएमआरआयटी / डीएनएमटी / डीएफआयटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या शिवाय 4 वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.  
 
नर्स किंवा परिचारिका - उमेदवारांकडे 12 वी नंतर 3 वर्षाचा डिप्लोमा इन नर्सिंग अँड मिडवाईफरीचा कोर्स असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त  केंद्रीय राज्य नर्सिंग कौन्सिल कडून नर्सची वैध परिचारिका नोंदणी असणे आवश्यक आहे, कारण हे अनिवार्य आहे.
 
वैज्ञानिक सहाय्यक- उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून 60 % गुणांसह बी.एस.सी .आणि 60 % गुणांसह मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट (पीजी) डिप्लोमा असणे आवश्यक आहे.  
 
वाहन चालक किंवा ड्रॉयव्हर- उमेदवार एचएससी(इयत्ता12वी) (विज्ञानासह रसायन विज्ञान)किंवा समकक्ष 50 टक्के गुणांसह असणे आवश्यक आहे.या शिवाय वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना (डीएल) सह एक वर्षाचा ड्रायव्हिंगचा अनुभव असणे आवश्यक आहे. राज्य सरकार च्या अग्निशामक प्रशिक्षण केंद्राकडून अग्निशमन उपकरणे(सीसीएफएफ) इत्यादींमध्ये अग्निशमन उपकरणे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 
 
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत सूचना वाचण्यासाठी येथे  http://www.barc.gov.in/careers/vacancy514.pdf  क्लिक करावे.     
 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे http://www.barc.gov.in/careers/recruitment.html क्लिक करावे.