शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022 (10:50 IST)

Govt. Job SSC-2022:45 हजार पदांवर भरती होणार, उद्या SSC च्या अर्जाची शेवटची तारीख,त्वरा अर्ज करा

govt jobs
कर्मचारी निवड आयोगाने (एसएससी) विविध केंद्रीय सशस्त्र दलांमध्ये कॉन्स्टेबल जीडीच्या नियुक्तीसाठी वेळापत्रक जारी केले आहे. यासाठी 10 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीत संगणकावर आधारित परीक्षा घेण्यात येणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC-2022) अंतर्गत आता विविध केंद्रीय दलांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी-जीडी) रँकच्या 45 हजारांहून अधिक पदांची भरती केली जाईल.

यापूर्वी पदांची संख्या केवळ 24 हजार होती. आता बीएसएफमध्ये 20 हजार 765 पदे, सीआयएसएफमध्ये पाच हजार 914 पदे, सीआरपीएफमध्ये 11 हजार 169 पदे, एसएसबीमध्ये दोन हजार 167 पदे, आयटीबीपीमध्ये 1,787 पदे, एआरमध्ये 3,153 पदे आणि एसएसएफमध्ये 154 पदे भरण्यात येणार आहेत.
 
यासाठी इच्छुक उमेदवार 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करून अर्ज आणि नियुक्ती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. आयोगाच्या म्हणण्यानुसार, ही भरती BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, SSF, आसाम रायफल्स आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये असेल.  
 
आयोगाच्या म्हणण्यानुसार, एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षा (सीबीई) 2022 10 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2023 दरम्यान आयोजित केली जाईल.
 
केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विभागांमधील ४५ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज करण्याचा सरकारी नोकरीचा उद्या शेवटचा दिवस आहे. एसएससीची परीक्षा 10 जानेवारी ते 14 जानेवारी दरम्यान होणार आहे. एसएससीने सीजीएलसह विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले.
 
उमेदवार आयोगाच्या ssc.nic.in या वेबसाइटला भेट देऊन संपूर्ण माहिती मिळवू शकतात. 
 
कर्मचारी निवड आयोगाने (एसएससी) येत्या फेब्रुवारीपर्यंत होणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या अंतर्गत, संयुक्त पदवी स्तर परीक्षा 2021 ची कौशल्य चाचणी 4-5 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. संयुक्त उच्च माध्यमिक परीक्षा 2021 साठी कौशल्य चाचणी 6 जानेवारी 2023 रोजी घेतली जाईल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, NIA, SSF आणि आसाम रायफल्समध्ये रायफलमॅन GD आणि कॉन्स्टेबल GD साठी संगणक आधारित परीक्षा 10 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2023 या कालावधीत होईल.

अर्ज सुरु होण्याची तारीख – 27 ऑक्टोबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022

Edited By- Priya Dixit