शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: सोमवार, 1 मार्च 2021 (14:32 IST)

Indian Army Recruitment: सेनेत भरतीसाठी सोनेरी संधी, लवकर ऑनलाइन अर्ज करा

भारतीय सेनेत नोकरी करु इच्छित असणार्‍या तरुणांसाठी सोनेरी संधी चालून आली आहे. सेनेत भरतीसाठी रैलीत भाग घेऊन योग्य उमदेवार नोकरी मिळवू शकतात. सेनेकडून राजस्थानच्या अलवर येथे आयोजित होणार्‍या भरती रैलीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सेना भरती रैली 20 एप्रिल ते 15 मे दरम्यान अलवर येथे होईल. ज्यात भरतपुर, धौलपुर, करौली, सवाई माधोपुर, दौसा आणि  अलवर जिल्ह्यातील योग्य उमेदवार भाग घेऊ शकतील.
 
तरुणांसाठी सोल जीडी, सोल टेक आणि सोल टीडीएन (8वी आणि 10वी) साठी सेना भरती आयोजित केली जाणार. रैलीत भाग घेण्यासाठी इच्छुक व योग्य उमेदवारांसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. अलवरमध्ये भरती रैलीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 20 फेब्रुवारी 2021 पासून सुरु होत असून 6 एप्रिल 2021 पर्यंत जारी राहील. 
 
ऑनलाइन अर्ज करण्यास अयशस्वी ठरल्यास उमेदवार सेना भरती रैलीत भाग घेण्यास असमर्थ ठरतील. सेना भरती रैलीत भाग घेण्यासाठी एडमिट कार्ड रजिस्टर्ड उमेदवारांना त्यांच्या ई-मेल आयडीवर पाठवले जातील. 
 
उमेदवारांना रिपोर्ट करण्याची तारीख आणि स्थान यानुसार एडमिट कार्डात उल्लेख केले जाईल. अधिसूचनेत सांगितले आहे की रैलीत सामील होणार्‍या सर्व उमेदवारांना COVID-19 प्रमाणपत्र सोबत आणावे लागेल. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार  https://joinindianarmy.nic.in/ वेबसाइटवर विजिट करु शकतात.