1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 (09:51 IST)

भारतीय तटरक्षक दलात भरती ; 12वी उत्तीर्णांना नोकरीची मोठी संधी

Indian Navy Day
भारतीय तटरक्षक दलात भरती निघाली असून बारावी पास उमेदवारांना नोकरी मिळविण्याची ही मोठी संधी असणार आहे. या भरतीची अधिकृत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी 13 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवार join.indiancoastguard.cdac.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन फॉर्म भरू शकतात. Indian Coast Guard Bharti 2024
 
अधिसूचनेनुसार, भारतीय तटरक्षक दलातील नाविक पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 260 पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह बारावी उत्तीर्ण केलेली असावी.
 
वयाची अट :
उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आहे, तर कमाल वय २२ वर्षांपेक्षा जास्त नसावे. अर्जदारांचा जन्म 1 सप्टेंबर 2002 ते 31 ऑगस्ट 2006 दरम्यान झालेला असावा.
 
विभागीय रिक्त पदांची संख्या :
उत्तर विभाग 79 पदे
पश्चिम विभाग 66 पदे
उत्तर पूर्व विभाग 68 पदे
पूर्व विभाग 33 पदे
उत्तर पश्चिम विभाग 12 पदे
अंदमान व निकोबार झोन ०३ पदे
 
अर्ज फी
उमेदवारांना अर्ज फी म्हणून 300 रुपये भरावे लागतील. तर, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. उमेदवार नेट बँकिंग किंवा Visa/Master/Maestro/RuPay क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा UPI द्वारे अर्ज फी भरू शकतात.
 
अर्ज कसा करावा
सर्वप्रथम joinIndiancoastguard.cdac.in/cgept अधिकृत वेबसाइटवर जा.
होम पेजवरील ‘ऑनलाइन अर्ज करा’ लिंकवर क्लिक करा.
आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
येथे ऑनलाइन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
यानंतर, अर्जाची फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
आता फॉर्म डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor