SEBI कडून अधिकारी ग्रेड A पदांसाठी उमेदवारांची भरती
सरकारी नोकऱ्या शोधणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने ऑफिसर ग्रेड ए पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी SEBI च्या अधिकृत साइट
sebi.gov.in या अधिकृत संकेत स्थळावर अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2022 आहे. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील 120 पदे भरण्यात येणार आहेत.
ही भरती जनरल स्ट्रीम , लीगल स्ट्रीम, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्ट्रीम, , रिसर्च स्ट्रीम आणि राजभाषा स्ट्रीम साठी अधिकारी श्रेणी A (सहाय्यक व्यवस्थापक) या पदासाठी असेल.
महत्त्वाच्या तारखा -
अर्ज करण्याची तारीख: 5 जानेवारी 2022 .
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24, जानेवारी 2022 .
पहिली ऑनलाइन परीक्षा: 20 फेब्रुवारी 2022 .
दुसरी ऑनलाइन परीक्षा: 20 मार्च, २०२२.
दुसऱ्या टप्प्याचा पेपर 2: 3 एप्रिल 2022
रिक्त पदांचा तपशील -
सामान्य : 80 पदे .
कायदा:16 पदे .
माहिती तंत्रज्ञान: 12 पदे .
रिसर्च: 7 पदे .
राज भाषा: 3 पदे .
पात्रता निकष
ऑनलाइन अर्ज करू इच्छिणारे उमेदवार येथे उपलब्ध तपशीलवार अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात .
निवड प्रक्रिया-
उमेदवारांची निवड ही तीन टप्प्यांची प्रक्रिया असेल- पहिला टप्पा (ऑनलाइन स्क्रीनिंग परीक्षा प्रत्येकी 100 गुणांचे दोन पेपर असतील), दुसरा टप्पा (ऑनलाइन परीक्षा प्रत्येकी 100 गुणांचे दोन पेपर असतील) आणि टप्पा III ( मुलाखत).
अर्ज फी-
अनारक्षित वर्ग /ओ बीसी /ई डब्ल्यू एस श्रेणीसाठी ₹1000/- आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि पीडब्ल्यूबीडी श्रेणीसाठी ₹100/- आहे.