testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

एसबीआयकडून बँक मित्रांचा शोध, रोजगाराची मोठी संधी

Last Modified बुधवार, 11 जुलै 2018 (16:27 IST)
एसबीआय बँकेकडून बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची संधी उपबल्ध करुन देण्यात येत आहे. एसबीआयने देशातील 8 राज्यांमध्ये एसबीआय बँक मित्रांचा शोध सुरू केला आहे. या पदासाठी निवड झाल्यानंतर मासिक वेतनासह कमिशनही मिळणार आहे.

देशातील ग्रामीण भागात आपली सेवा पोहोचविण्यासाठी एसबीआयने 'बँक मित्र' नावाने जागा भरण्यास सुरुवात केली आहे. बिझनेस करस्पाँडन्टप्रमाणे हे एसबीआय मित्र आपले काम करतील. ग्राहकांचे बँकेत खाते उघडून देणे, पैसे जमा करणे, बँकेतून पैसे काढणे यांसारखी कामे बँक मित्रांद्वारे करण्यात येतील. यासोबतच इतर आर्थिक योजनांचीही माहिती ग्राहकांना देतील, त्यामुळे ग्राहकांना गुंतवणूक करणे सोपे होणार आहे. देशात सध्या 1.25 लाख बँक मित्र आहेत. बँकेकडून त्यांना दोन हजार ते 5 हजार रुपयांपर्यंतचा पगार देण्यात येतो. त्यासह प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर कमिशनही मिळते.

* रिक्त पदे -
बँक मित्र पदासाठी उत्तर प्रदेशमध्ये 43, महाराष्ट्रात 261, बिहारमध्ये 18, दिल्लीत 120, छत्तीसगडमध्ये 24, आसाममध्ये 64, अरुणाचल प्रदेशमध्ये 15 आणि आंध्र प्रदेशमध्ये 16 जागांवर ही भरती करण्यात येत आहे.

* पात्रता -
बँक मित्र पदासाठी उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. या पदसाठी निवृत्त बँक कर्मचारी, निवृत्त शिक्षक, सैन्यातील निवृत्त व्यक्ती, निवृत्त सरकारी कर्मचारी, किराणा किंवा मेडिकल दुकानाचे मालिक, सरकारी स्‍मॉल सेविंग्‍स स्‍कीम्‍स किंवा इन्शुरन्स कंपनींचे प्रतिनिधी, पेट्रोल पंप मालक, निवृत्त पोस्‍ट मास्‍टर, NGO इत्यादी सहभागी आहेत.

* बँक मित्र बनण्यासाठी आवश्यक कागदपत्रे -
ओळखपत्र पुरावा (सरकारी मान्यता प्राप्त कार्ड)
रहिवाशी दाखला (वीज बिल, टेलिफोन बिल)
10वीचे गुणपत्रक
कॅरेक्टर सर्टिफिकेट (पोलिसांकडून तपासणी झालेले)
बँक अकाऊंट डिटेल्स, पासबुक, चेकबुक.
दोन पासपोर्ट साइज फोटो.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

चाळिशीनंतरची तंदुरुस्ती

national news
मराठीतील कलरफुल अभिनेत्री पुजा सावंतचा ‘लपाछपी’हा सिनेमा चाळिशीनंतर महिलांची चयापचय ...

‘फ्रेंच मॅनिक्‍युअर’करा घरच्या घरी

national news
जेणेकरून नखांच्या उर्वरित ठिकाणी ते पसरणार नाही. आता यावर व्हाईट पॉलिश लावा. यानंतर ते ...

चीले चपाती

national news
बेसन पिठात तिखट, हिंग, मीठ, हळद, ओवा कोथिंबीर, पाणी घालून एकजीव करून घ्यावे. गव्हाच्या ...

या काळात मूडमध्ये असतात महिला

national news
एका सर्वेक्षणात हे स्पष्ट झाले आहेत की महिला आणि पुरुषांमध्ये शारीरिक संबंध बनवण्याची ...

गणपतीसारख्या भव्य देवतेला उंदरासारखे एवढेसे छोटे वाहन कसे

national news
गणपतीची कोणतीही मूर्ती पाहिली तरी गणपतीबाप्पांच्या पायाशी वाहन म्हणून असलेला मूषक किंवा ...