शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (23:29 IST)

UPPSC admit cards 2021 : UPPSCने स्टाफ नर्स/सिस्टर ग्रेड 2 2021च्या परीक्षेचे प्रवेशपत्रे जारी केले

UPPSC admit cards 2021 for staff nurse/sister grade 2 exam : उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर स्टाफ नर्स/सिस्टर  ग्रेड -2 परीक्षा -2021 साठी प्रवेशपत्रे जारी केली आहेत. उमेदवार आपले प्रवेशपत्र UPPSC च्या अधिकृत वेबसाइट uppsc.up.nic.in वरून डाउनलोड करू शकतात.
 
प्रयागराज, लखनौ, गाझियाबाद, मेरठ आणि गोरखपूर या पाच जिल्ह्यांच्या परीक्षा केंद्रांवर 3 ऑक्टोबर 2021 (रविवार) एकाच सत्रात सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहचण्याचा आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणि ओळखपत्राची एक प्रत मूळ ओळखपत्रासह सोबत घेण्याचा सल्ला दिला जातो.
 
UPPSC प्रवेशपत्र
 
UPPSC प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे:
UPPSC च्या अधिकृत वेबसाइट uppsc.up.nic.in ला भेट द्या.
"Admit Card :- CLICK HERE TO DOWNLOAD ADMIT CARD FOR ADVT. NO. A-4/E-1/2021, STAFF NURSE /SISTER GRADE-2 (MALE/FEMALE) EXAM-2021" या लिंकवर क्लिक करा " डिटेल्स  सबमिट करा.
 
प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट आउट घ्या.