ब्यूटी ट्रीटमेंट घ्या पण.....
सुंदर दिसण्याची इच्छा स्त्रिययांमध्ये फार आतूनच असते. त्यामुळेच तर ब्यूटी ट्रीटमेंटची सध्या चलती आहे. शाळेतल्या मुलींपासून ते गावातल्या महिलांपर्यंत हे ब्युटी पार्लरचे लोण पसरले आहे. शहरात तर ही क्रेझ केवळ केस कापणे, थ्रेडींगपर्यंत मर्यादित नसून लहान मोठ्या शहरात बोटेकस, लेजर, कॉस्मेटिक सर्जरी किंवा या प्रकारच्या अन्य प्रक्रियेपर्यंत वाढली आहे. पण या सगळ्या गोष्टीची पूर्ण माहिती न घेताच या ट्रिटमेंट अनुसरल्या जातात. भोंदू वैद्यांची जशी चलती आहे त्याप्रमाणे ह्या क्षेत्रातही बरेच भोंदू लोक आहेत. त्यांच्या चुकीच्या उपचारांमुळे होणारे नुकसान पाहिले जात नाही. चकचकीत व भुल घालणार्या जाहिरातींना भुलून उपचार करून घेणे घातक ठरू शकते.ब्युटीशियन, डर्मेटॉलॉजिस्ट तसेच कॉस्मॅटॉलॉजिस्टची वाढती संख्या पाहता सुंदर दिसण्याची व चिरतरूण राहण्याची क्रेझ किती वाढली आहे हे दिसून येते. पण खूप कमी पार्लर किंवा ब्युटी थेरपिस्ट सर्व सावधगिरी व नियम पाळतात. त्यामुळे धोका अजून वाढतो आहे. या चिरतारूण्याचा फायदा होऊ लागल्याने या टेक्निक वापरणार्यांचा पूर आला आहे. या थेरपिस्ट फक्त सिनेतारका, सेलिब्रेटीज आणि मॉडेल्सपर्यंतच मर्यादित नसून शाळेत जाणार्या मुलींपासून ते मध्यमवयीन गृहीणींपर्यंत तसेच पुरूषांमध्येही लोकप्रिय आहेत. त्यामुळे गल्लीबोळात ही ब्युटीपार्लस् आणि स्किन केअर क्लिनिक निघाली आहेत.
स्वस्तात ब्यूटी ट्रिटमेंट देण्याचे अमीष दाखविले जाते. त्या लोभाला अनेक जण बळी पडतात. प्रशिक्षित किंवा डिग्रीधारक ब्युटीशियन तसेच थेरपीस्ट यांची संख्या खूप कमी आहे. त्याचा परिणाम भोगावा लागतो. काहीजण काही आठवडे कोणाच्या तरी हाताखाली शिकून स्वत:चे पार्लर सुरू करतात आणि स्क्रीन ट्रिटमेंटचा दावा करतात. त्यामुळे आपल्याला विलक्षण सावधगिरी बाळगायला हवी. हे नवशिके ब्यूटी थेरेपिस्ट स्वस्त प्रॉडक्ट तर वापरतातच पण चुकीच्या पध्दतीने वापरून चेहर्याला धोका निर्माण करतात. शिवाय स्वच्छतेच्या तक्रारीही वेगळ्याच. पुरूष असो वा स्त्री, अशा प्रकारच्या ब्युटी सलूनमुळे त्वचारोगापासून ते एडस्सारख्या गंभीर व संक्रमित रोग होऊ शकतात.
पार्लरमध्ये वापरले जाणारे कंगवे, कात्री, रेझर, स्पंज, ब्रशेस, वॅक्सींग पॅडस्, पावडर पफ, तसेच टॉवेलपासून केमिकलपर्यंत सावधगिरी न बाळगल्यास व स्वच्छता न ठेवल्यास ते हानीकारक ठरतात. वापरली जाणारी प्रसाधने, त्याबद्दलची अपुरी माहीती अडचणी निर्माण करतात. त्वचेवर उपचार करताना ब्युटीशियनने हात धुणे किंवा डिस्पोजेबल ग्लोव्हज वापरणे गरजेचे असते. पण बरेचसे लोक या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. तसेच स्क्रीन ट्रीटमेंटपूर्वी ट्रायल घेण्यासही लोक महत्त्व देत नाहीत. याचप्रमाणे लेझर किंवा इलेक्ट्रोलायसिस सारख्या टेकनिक पण पूर्ण नियमाचे पालन सगळेच पार्लर करतात असे नाही. चूक झाल्यास त्वचेतच काही तरी प्रॉब्लेम असल्याचे सांगितले जाते. या गोष्टींकडे लक्ष द्या....* त्वचेवर उपचार करताना ब्युटीशियन योग्य प्रशिक्षण घेतलेली असावी. छोट्या बाबतीत सुध्दा. * ट्रिटमेंटपूर्वी ब्युटीशियनला हात धुण्यास तसेच ग्लोव्हज घालण्यास नक्की सांगा. तसेच वापरातल्या वस्तू (कंगवा, टॉवेल, वॅक्सींग स्ट्रीप) बदलण्यास सांगा. * कोणत्याही ट्रिटमेंटपूर्वी पॅच टेस्ट पक्की करा. त्यामुळे तुमच्या त्वचेचा प्रकार कळतोच पण त्वचेवर होणार्या प्रतिक्रियाही कळतात. * स्वस्तात मिळते आहे म्हणून ती ट्रीटमेंट न करता योग्य नियमांनीच प्रयोग करा. * स्वत: कोणताही प्रयोग करण्यापासून लांब रहा. अर्थात ज्या गोष्टींची पूर्ण माहीती आहे त्याच आजमावून बघा.