1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: सोमवार, 26 जून 2023 (20:13 IST)

Anarkali फॅशन 'अनारकली'ची

फॅशनच्या बाबतीत बोलू तेवढे कमीच आहे. दररोज बाजारत एक नवी फॅशन दिसते. त्यातही कपड्यांच्या तर्‍हा तर पाहायलाच नकोत. सध्या लग्नसराईचा मौसम सुरू आहे. त्यामुळे आलेल्या पाहुण्यांपैकी नव्वद जणींचा अनारकली सुट असतोच असतो. कॉटन अनारकली, वर्कड अनारकली, शरारा अनारकली, पेटलेट्स अनारकली, डबल घेर अनारकली असे विविध प्रकार यात पाहायला मिळतात. त्यातच आता भर पडली आहे ट्रान्सपरंट अनारकलीची.
 
या ड्रेसचा वरचा अर्धा भाग कॉटन, शिफॉन, वेलवेट अशा मटेरियलच्या असून त्यावर पूर्णत: वर्क केलेले असते, तर ड्रेसचा खालचा घेर संपूर्ण ट्रान्सपरंट असतो. या स्टायलची ‍खासियत म्हणजे त्याची सलवार प्लेन नसून चुडीदार स्टायलची मस्त भरीव वर्क केलेली असते. पायावरची ही डिझायनर चुडी उठून दिसावी म्हणूनच अनारकलीचा घेर ट्रान्सपरंट ठेवला जातो. या पॅटर्नमध्ये क्रेप, सिल्क, वेलवेट, क्रश अशा मटेरिअल्सला जास्त मागणी आहे ही फॅशन नवखी असली, तरी त्याला भरपूर पसंती आहे.
 
अनारकली ड्रेसइतकाच महत्त्वाचा असतो त्याचा चुडीदार, पण अनारकलीवर खूपच वर्क असल्याने पायावरची चुडी झाकली जाते. त्यावरची डिझायनर चुडी दिसण्यासाठी अनारकलीच्या टॉपमध्ये असा बदल करण्यात आला आहे.