सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (13:45 IST)

Jeans परिधान करताना या गोष्टींची काळजी घ्या.

आजच्या काळात जीन्स घालणे बऱ्याच मुलींना आवडत, आपल्या घरातील वार्डरोबचा हा एक अगदी सामान्य भाग आहे. आरामदायक असून हे एक स्टायलिश लुक देखील देते. आपणास देखील जीन्स घालायला आवडत असेल आणि आपण परिधान करत असाल तर आपणास जीन्सशी निगडित काही महत्त्वाच्या गोष्टींना जाणून घेणे आवश्यक आहे. कारण जर आपल्याला या गोष्टीं विषयी माहिती नसेल तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण लुक वर देखील होऊ शकतो. म्हणून जीन्स खरेदी करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी.
 
* जर आपण लो-वेस्ट जीन्स घालत आहात, तर याच्या सह क्रॉप टॉप परिधान करू नका. हे आपले संपूर्ण लुक खराब करू शकत. म्हणून लो-वेस्ट जीन्स घालताना टॉपची काळजी घ्या.
 
* नेहमी सोबर आणि सौम्य रंग निवडा. खूप भडक रंग निवडू नका. हे आपल्या संपूर्ण लुकला खराब करू शकतं. म्हणून भडक रंगाची निवड करू नका. या ऐवजी सौम्य आणि साजेशी रंग निवडा.
 
* आपल्या साइज आणि चांगल्या फिटिंगची जीन्स घाला. जर आपली उंची कमी आहे तर हाय राइझ डेनिम जीन्स घाला.
 
* स्किनी जीन्स परिधान करताना काळजी घ्या की आपण सीमलेस अंतर्वस्त्र घालण्याची चूक करू नका हे आपल्या संपूर्ण लुक ला खराब करू शकत.
 
* आपल्या कम्फर्टचा विचार करूनच जीन्स निवडा. फॅशन मध्ये काही असे करू नका ज्यामुळे आपण कम्फर्ट नसाल. म्हणून विचारपूर्वकच जीन्स घाला.