बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: रविवार, 11 जुलै 2021 (12:32 IST)

मास्कचा फॅशन फंडा

सध्या मास्कचा जमाना आहे. मास्क घातल्याशिवाय बाहेर जाताच येत नाही. मास्कमुळे चेहर्याचा अर्धा भाग झाकला जातो. अर्थात या मास्कसोबतही तुम्ही फॅशनेबल राहू शकता, दिसू शकता. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मास्क मिळतात. तुम्ही घरीही छानसं मास्क बनवू शकता. पेहरावानुसार मास्कची निवड करा आणि फॅशनचं गणित चटकन सोडवा. मास्कसोबत फॅशनेबल दिसण्यासाठी काय करायला हवं याबाबतच्या काही टिप्स...
 
* सर्जिकल मास्क मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. हे मास्क कोणत्याही कपड्यांसोबत शोभून दिसतात. भारतीय तसंच पाश्चिमात्त्य पेहरावासोबत तुम्ही सर्जिकल मास्क कॅरी करा. त्यातही साडी, सलवार कमीझ अशा पारंपरिक भारतीय पेहरावांसोबत सर्जिकल मास्क शोभून दिसतात. भारतीय पेहराव केला असेल तर शक्यतो निळ्या रंगाचं मास्क लावा. वेस्टर्न वेअरवर पांढरं मास्क खुलून दिसेल.
* एन-95 मास्कही लोकप्रिय आहेत. यामुळे कोरोना विषाणूसह प्रदूषणापासूनही बचाव होतो. हे मास्क चंकीफंकी कपड्यांसोबत खुलून दिसतात. जॉगर्स, एक्सरसाईज पँट, शॉर्टस्‌, रिप्ड जीन्स, पुलओव्हर घातले असतील तर एन 95 मास्क लावा. या मास्कमुळे तुम्हाला कॅज्युअल लूक मिळेल.
* कॉटन प्रिंटेड मास्कही उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या रंगांचे, प्रिंट्‌सचे हे मास्क खूप छान दिसतात.भारतीय पेहरावासोबत कॉटन मास्क कॅरी करा. सारा अली खाननेही सलवार कमीझवर छानसं कॉटन मास्क घातलं होतं.
* तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं काळ्या रंगाचं मास्क असेल तर ते कॅज्युअल प्रसंगी वापरा. जीन्स, टी शर्ट, पलाझो, केप्रीवर ब्लॅक मास्क घालता येईल. निऑन रंगांच्या पेहरावासोबत ब्लॅक मास्क शोभून दिसेल. तुम्ही फुल ब्लॅक लूकही कॅरी करू शकता.
श्रीशा वागळे