सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: गुरूवार, 1 ऑक्टोबर 2020 (11:55 IST)

कुर्त्याच्या स्टायलिंग टिप्स...

आपण वेगवेगळ्या प्रकारचे, स्टाईलचे कपडे आणतो. त्यातही विविधांगी कुर्त्यांनी आपला वॉर्डरोब व्यापलेला असतो. सध्या निळ्या रंगाचे कुर्ते ट्रेंडमध्ये आहेत. बॉलिवूड सेलेब्जही निळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसतात. तुमच्याकडे एखादा निळा कुर्ता असेल तर त्याच्या स्टायलिंग टिप्स...
 
* करिना कपूरने मध्यंतरी नक्षीकाम केलेला कुर्ता परिधान केला होता.पांढर्याे कुर्त्यावर निळं नक्षीकाम खूप शोभून दिसत होतं. सोबर पण हटके लूक देणारा कुर्ता कोणालाही कॅरी करता येईल. अशा कुर्त्यांवर व्हाईट किंवा ब्लू लेगिंग, पँट किंवा पलाझो घालता येईल. नक्षीकाम केलेले कुर्ते दिसतातही खूप छान. हे कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा.
*निळ्या कुर्तीवर पांढर्यान रंगाचं डिझाइन खूप शोभून दिसतं. अशी कुर्ती फॉर्मल आणि कॅज्युअल अशा दोन्ही ऑकेजन्सना घालता येते. या कुर्तीवर पलाझो किंवा पँट घालता येईल. दुपट्टा किंवा स्कार्फने तुमचा लूक खुलवता येईल. या कुर्त्यावर सिल्व्हर अॅेक्सेसरीज खूप शोभून दिसतात.
* डेनिम कुर्तीज सुंदर दिसतात. डेनिम्सवर पांढर्याक रंगाची लेगिंग घातली जाते. पणतुम्ही कुर्तीतल्या रंगांचं कॉम्बिनेशन करून स्टाईल करू शकता. काजोलने मध्यंतरी डेनिम कुर्ता घातला होता. या शॉर्ट कुर्त्यावर छान नक्षीकाम करण्यात आलं होतं. असं नक्षीकाम केलेले कुर्ते तुम्ही घेऊ शकता.
* ब्लू आणि ऑरेंज हे कॉम्बिनेशनही छान दिसतं. मौनी रॉयने अशा पद्धतीची स्टाईल केली होती. तिच्या कुर्त्यावर सोनेरी नक्षीकामही होतं. यावर तिने केशरी रंगाचा दुपट्टा घेतला होता. तुम्हीही ब्लू अँड ऑरेंज घालू शकता. ब्लू कुर्त्यावर ऑरेंज लेगिंग असं काहीतरी कॉम्बिनेशन करता येईल.
* ब्लू अँड व्हाईट प्रिंटेड कुर्तीवर निळ्या रंगाचा श्रग घेता येईल. फॅशनिस्टा सोनम कपूरकडून तुम्ही हे धडे घेऊ शकता. तिने असा लूक केला होता. तुम्हीही प्लेन कुर्त्यावर ब्लू श्रग घेऊ शकता. हा लूक स्टायलीश अॅक्सेसरीजनी खुलवता येईल.
 
आरती देशपांडे