सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (16:12 IST)

बॅग्स ची अशा प्रकारे काळजी घ्या,दीर्घकाळा पर्यंत खराब होणार नाही

आजच्या तरुण मुलींकडे बॅग्सचा चांगला संग्रह असतो. तरी ही त्या नेहमी तक्रार करतात की त्यांच्या बॅग्स लवकर खराब होतात किंवा त्यांना पुन्हा पुन्हा दुरुस्त करावे लागते. जर आपण आपले बॅग्स व्यवस्थितरित्या साठवून ठेवल्या नाहीत,तर त्यांना वारंवार दुरुस्तीची गरज पडेल.अशा परिस्थितीत, आज आम्ही आपल्याला बॅग्स कशा व्यवस्थित ठेवाव्यात  हे सांगत आहोत,जेणेकरून बॅग्स दीर्घकाळ मजबूत आणि चमकदार राहतील.चला तर मग  जाणून घेऊ या.
 
1 योग्य ठिकाणी कपाट असावे -आपले बॅग्स नेहमी थंड आणि अंधारी ठिकाणी ठेवावे. आपले कपाट  देखील अशा ठिकाणी असावे जिथे सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही. वास्तविक, सूर्यप्रकाशामुळे,बॅग्स चा रंग फिकट होतो आणि चामडं देखील खराब होते. म्हणून आपल्या बॅग्स थेट सूर्यप्रकाशात ठेवणे टाळा.
 
2 बॉक्समध्ये साठवून ठेऊ नका-बॅग्स बॉक्समध्ये ठेऊ नका. बॉक्सवरील ग्लूमुळे बॅग फाटू शकतो, विशेषत: चामड्याच्या बॅग्सवर परिणाम होतो. याशिवाय, बॉक्समध्ये ठेवल्याने बॅगमधून दुर्गंधी येऊ शकते.
 
3 एकमेकांना चिकटून ठेऊ  नका -बॅग्स एकमेकांना चिकटवून ठेऊ नका. आपल्या कडे बॅग्स दरम्यान जागा नसल्यास, त्यांना त्यांच्या डस्ट बॅग्स, उशाचे कव्हर किंवा ब्रीदेबल फॅब्रिकमध्ये ठेवा.यामुळे, त्यांच्यावर धूळ आणि माती  साठणार नाहीत आणि ते सुरक्षित देखील राहतील.
 
4 प्लास्टिक पिशव्यांमध्ये साठवू नका -प्लास्टिकच्या पिशव्या किंवा सीलबंद कंटेनरमध्ये साठवणे टाळा कारण हँडबॅगला हवा लागणे देखील आवश्यक आहे आणि थोडक्या ओलसरपणामुळे देखील बुरशी येऊ शकते.
 
5 बॅग लोम्बकळत ठेवणे टाळा-बॅग लटकवून ठेऊ नका कारण यामुळे हँडल सैल होतील. नेहमी कपाटात बॅग्स साठवून ठेवा.जर बॅग्स मध्ये धातूची साखळी किंवा पट्टा असेल तर तो साठवताना बॅगच्या आत ठेवा.आपण बॅगचा पट्टा फोम किंवा बटर पेपरमध्ये देखील गुंडाळून ठेऊ शकता.