मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: गुरूवार, 3 ऑगस्ट 2023 (23:20 IST)

Travelling dress for women प्रवासात कसा असावा तुमचा ड्रेसअप

travel dress
Travelling dress for women सहलीला जाण्याचे नियोजन केल्यावर तुम्ही खास शॉपिंग करता. तरीही नेमके कोणते ड्रेस घेऊन जावे, याबाबतीत गोंधळता. प्रवासात जेवढे साधे आणि हलक्‍या वजनाचे कपडे घालाल तेवढे तुम्हाला आरामदायी वाटेल. यामुळे अशी करा तुमच्या ड्रेसअपची निवड…
 
टी-शर्ट- जर तुम्हाला साध्या आणि ग्लॅमरस लुकचा शौक असेल तर टी-शर्टहून चांगले काहीच असू शकत नाही. रोड ट्रिप असू दे अथवा ट्रेन प्रत्येक ठिकाणी हे सोयीस्कर ठरते. लांब प्रवास असेल तर टी-शर्टसोबत शॉर्टस आणि ट्राउजर घालणे जास्त सोयीचे राहील.
 
स्केटर – नव्या अंदाजासोबत पुन्हा स्केटर ड्रेस ट्रेंडमध्ये आले आहेत. कम्फर्टेबल, कुल आणि परफेक्‍ट वाटणारा हा ड्रेस ट्रेवलर्सच्या पसंतीस उतरला आहे. या सोबत स्कर्ट अधिकच खुलून दिसतो.
 
मॅक्‍सी ड्रेस – मॅक्‍सी ड्रेस ट्रॅवलर्सच्या आवडीचा आहे. वेगळा आणि सेक्‍सी लुक या ड्रेसने येतो.
 
मिडी – प्रवासादरम्यान स्टायलिश दिसायचे असेल तर मिडी खूप छान दिसते. यासोबत वेगवेगळे ऍक्‍सेसरीजने तुम्ही हटके दिसू शकता. गुडघ्याखालील मिडी ट्रेंडी आणि आकर्षकही दिसते.