शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 24 एप्रिल 2019 (14:24 IST)

Feng Shui : काय आहे फेंगशुईतील तीन नाण्यांचे गुपित

धनप्राप्तीसंबंधीचे भाग्य क्रियाशील करण्यासाठी चिनी नाण्यांचा उपयोग हा खूपच प्रभावकारी आहे. आपण तीन चिनी नाणी लाल रंगाच्या दोर्‍याने किंवा फितीने बांधू शकता आणि ती आपल्या पैशांच्या पाकिटात किंवा बटव्यात ठेवू शकता. आपल्याला सतत मिळणार्‍या मिळकतीच्या उगमस्‍थानाचे हे प्रतीक आहे. आपण चार किंवा पाच नाण्यांऐवजी तीन नाण्यांचा उपयोग करू शकता, कारण चिनी परंपरेनुसार तीन हा अंक खूपच भाग्याशाली आहे. 
 
ही नाणी लाला रंगाच्या धाग्याने किंवा फितीने बांधणे खूपच आवश्यक आहे. कारण लाल रंगाचा धागा किंवा फीत ही नाण्यांना क्रियाशील करते आणि त्यातून यांग ऊर्जा प्रगट होते. ही नाणी व्यक्तीला भेट म्हणून देणे, हे खूपच शुभकारक मानले जाते. जर आपण कोणाला भेटीदाखल कोणती ही वस्तू देत असाल, तर त्या वस्तूबरोबर ही नाणी ही देता येतात. कारण हेसुद्धा अतिशुभ मानले जाते.