बुधवार, 29 ऑक्टोबर 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 10 जानेवारी 2019 (18:36 IST)

कोण होता लाफिंग बुद्धा आणि हे नाव त्याला कसे मिळाले, जाणून घ्या

Laughing Buddha
जगातील बर्‍याच देशांसोबत भारतात ही लाफिंग बुद्धा (Laughing Buddha) च्या लहान लहान मुरत्या किंवा फोटो घरात ठेवणे शुभ मानले जाते. अशी मान्यता आहे की लाफिंग बुद्धाची मूर्ती किंवा फोटो घरात ठेवल्याने परिवारात सुख समृद्धी आणि खुशहाली येते. पण काय तुम्हाला माहीत आहे की लाफिंग बुद्धा कोण होता आणि याचे नाव लाफिंग बुद्धा कसे पडले.  
 
कोण होता लाफिंग बुद्धा...
असे म्हटले जाते की महात्मा बुद्धाचा एक जपानी शिष्य होता, ज्याचे नाव होतई होते. अशी मान्यता आहे की ज्ञान प्राप्त झाल्यानंतर होतई जोर-जोराने हसू लागले आणि तेव्हापासून त्यांनी लोकांना हसवणे आणि आनंदी बघणे हे आपल्या जीवनाचा एकमात्र उद्देश्य बनवून घेतला होता. ह्याच कारणामुळे जपान आणि चीनचे लोक त्यांना 
हसणारा बुद्धा म्हणू लागले आणि याचेच इंग्रजी नावात रूपांतरण झाले ते आहे लाफिंग बुद्धा. होतईप्रमाणे त्यांचे अनुयायी देखील लोकांना हसवणे आणि त्यांना आनंदी ठेवण्याच्या उद्देश्याने जगभरात पसरू लागले. चीनमध्ये होतईला पुतईच्या नावाने ओळखले जातात आणि यांना फेंग शुईचा देव मानला जातो. मान्यता अशी आहे की 
लाफिंग बुद्धाची मूर्ती किंवा फोटो घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा आणि गुड लक येतो.