शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. सण
Written By वेबदुनिया|

खानदेशातील प्रसिद्ध पोळा

WD
खानदेशात जळगाव तालुक्यातील 'वराडसीम' या गावाचा पोळा प्रसिद्ध आहे. त्या गावातल्या जुन्या भव्य ऐतिहासिक दरवाजाच्या खिडकीतून बैल कुदवला जातो. शेकडो वर्षांपासूनची परंपरा कायम टिकून आहे.

पोळ्याच्या दिवशी घरोघरी कुंभाराकडून आणलेल्या मातीच्या बैलांचे पूजन होते. त्यांनाही नैवेद्य दाखवला जातो. इतर जनावरांनाही अंघोळ घालून त्यांचे औक्षण केले जाते. मानाच्या बैलाची गावभर मिरवणूक निघते. त्यालाच 'बाशिंग्या बैल' म्हणतात. त्याच्या माथ्यावर शिंगांमध्ये मोठे बाशिंग बांधले जाते. त्याला अंगभर सजवले जाते.