1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Modified: शनिवार, 29 ऑगस्ट 2020 (17:32 IST)

अनंत चतुर्दशी व्रत कहाणी: श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितलेली कथा

अनंत चतुदर्शीला या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात.
 
पांडवांना द्यूतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी त्यांना उपदेश केला. त्याची कथा याप्रकारे आहे-
 
प्राचीन काळात सुमंत नावाचा एक नेक तपस्वी ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचे नाव दीक्षा असे होते. त्यांना परम सुंदरी धर्मपरायण आणि ज्योतिर्मयी कन्या होती जिचं नाव सुशीला असे होते. परंतू दुर्देवाने सुशीलाची आई दीक्षाचा मृत्यू झाला तेव्हा सुमंतने कर्कशा नावाच्या स्त्रीची दुसरं लग्न केलं. 
 
सुशीलाचा विवाह ब्राह्मण सुमंतने कौंडिन्य ऋषीसोबत लावून दिले आणि विदाईच्या वेळी मुलीला काही द्यावायचे म्हणून सावत्र आई कर्कशाने जवायाला काही विटा आणि दगडाचे तुकडे बांधून दिले.
 
कौंडिन्य ऋषी दुखी मनाने आपल्या पत्नीसह आपल्या आश्रमाकडे निघून गेले. रस्त्यात रात्र झाली आणि ते एका नदीकाठावर संध्या करु लागले.
 
सुशीलाने बघितले की तेथे स्त्रिया सुंदर वस्त्र धारण करुन कोणत्यातरी देवाची पूजा करत होत्या. सुशीलाने विचारणा केली तर त्या स्त्रियांनी तिला विधिपूर्वक अनंत व्रताची महत्ता सांगितली. सुशीलाने तिथेच त्या व्रताचे अनुष्ठान केले आणि चौदा गाठी असलेला दोरा हातात बांधून पती कौंडिन्यजवळ आली.
 
कौंडिन्यने सुशीलाला दोर्‍याबद्दल विचारल्यावर तिने पूर्ण गोष्ट सांगितली. त्यांनी तो दोरा तोडून अग्नीत टाकून ‍दिला याने भगवान अनंताचा अपमान झाला. 
 
परिणामस्वरुप ऋषी कौंडिन्य दुखी राहू लागले. त्यांची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि त्यांनी आपल्या पत्नीला दारिद्रयाचे कारण विचारल्यावर सुशीलाने त्यांना दोरा जाळून राख केल्याची गोष्ट स्मरण करुन दिली.
 
पश्चाताप करत कौंडिन्य अनंत दोर्‍याची प्राप्तीसाठी रानात निघून गेले. अनेक ‍दिवस रानात भटकत असताना निराश होऊन ते भूमीवर पडून गेले.
 
तेव्हा अनंत भगवान प्रकट होऊन म्हणाले की - 'हे कौंडिन्य! तु माझा तिरस्कार केला होता, त्यामुळे तुला कष्ट भोगावे लागले. तुझ्यावर दुख कोसळले. आता तुला त्याचा पश्चाताप असल्यामुळे मी आता तुझ्यावर प्रसन्न आहे. आता तु घरी जाऊन विधिपूर्वक अनंत व्रत करं. चौदा वर्षापर्यंत व्रत केल्याने तुझे सर्व दुख दूर होती. 
 
धन-संपत्ती लाभेल. कौंडिन्यने तसेच केले आणि त्यांना सर्व क्लेशापासून मुक्ती मिळाली.
 
श्रीकृष्णाच्या आज्ञेप्रमाणे युधिष्ठिराने देखील अनंत देवाचे व्रत केले ज्याच्या प्रभावामुळे पांडव महाभारत युद्धात विजयी झाले आणि चिरकाल राज्य करत राहिले.