सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By

कोकिलाव्रत कथा

ब्रम्हदेवाला दहा पुत्र त्यातील दक्षप्रजापती, त्याला 101 कन्या होत्या. ज्येष्ठ कन्या दाक्षायणीचा शंकराशी, 27 कन्या चंद्राला व इतर कन्यांचे विवाह इतर देवांशी करून दिले. दक्षाला पुत्र नव्हता म्हणून कपीलमुनींनी त्यास पुत्रकामेष्टि यज्ञ करण्यास सुचविले. दक्षाने मग एका विशाल मैदानात यज्ञाची सिद्धता केली. दक्षाने सर्व देवांना, ऋषींना आमंत्रणे पाठविली, पण शंकराला मात्र वगळले......बघा व्हिडिओ


सतीने याचना केली तेव्हा शिव म्हणाले तुला पश्चात्ताप झाला आहे म्हणून तू पक्षिणी जरी झालीस तरी गोड आवाजाची कोकिळा होऊन सदैव नंदवनात विहार करतील. शंकर पुढे म्हणाले दहा हजार वर्ष झाल्यावर तुला हिमालयाची पत्नी मेनका हिच्या पोटी जन्म मिळेल आणि हरितालिका व्रताच्या प्रभावाने पुन्हा आपला विवाह होईल. त्या प्रसंगी शिवाने तिला वर दिला ज्या स्त्रिया अधिक आषाढानंतर शुद्ध आषाढात तुझे पूजन करतील त्यांना कधीही वैधव्य येणार नाही. त्यापासून कोकिलाव्रत भूलोकी प्रचलित झाले.