शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By
Last Modified: शनिवार, 12 डिसेंबर 2015 (14:35 IST)

कॅरी ऑन देशपांडे : चित्रपट परीक्षण

एका पेक्षा जास्त बायका असलेला पुरूष आणि त्याची त्या सगळ्याजणींना सांभाळताना होणारी गोची, हा विषय आजपर्यंत आपण अनेक चित्रपटांतून पाहिलाय. त्यामुळे कॅरी ऑन देशपांडे ह्या विजय पाटकर दिग्दर्शित चित्रपटात
तुम्हांला पुन्हा एकदा तोच विषय पाहायला मिळतो. प्रेमकथा जेव्हा पडद्यावर सादर होतात. तेव्हा त्यातलं सादरीकरण हे दिग्दर्शकाचं कसब असतं. तसंच दोन किंवा त्यापेक्षा अधिक बायका सांभाळताना एखाद्या पुरूषाची होणारी त्रेधातिरपिट आणि त्यातून होणारी विनोदनिर्मिती ही गोष्ट सुध्दा जर सादरीकरणात नवेपणा ठेवला नाही तर कंटाळवाणी होऊ शकते, हे हा चित्रपट बनवताना ध्यानात ठेवणं आवश्यक होतं. त्याचप्रमाणे पुष्कर श्रोत्री हा चित्रपटाचा मुख्य हिरो म्हणून पाहणं असह्य असल्याचंही चित्रपट पाहिल्यावर कळतं. पुष्करमध्ये मानसी नाईकने भाळावं असा चार्म असल्याचं दिग्दर्शकाला का वाटलं असावं, ते दिग्दर्शकच जाणे.

जाहिरात कंपनीत काम करणार्‍या आणि दोन-दोन लग्न केलेल्या शशी देशपांडेची ही कथा आहे. दोन बायकांना सांभाळताना उडणारी तारांबळ काय कमी असते. तर त्याच्या आयुष्यात मल्लिका येते. आणि मग शशी या तीन बायकांमध्ये कसा फसत जातो, त्याची ही कथा आहे.