testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कॅरी ऑन देशपांडे : चित्रपट परीक्षण

carry on deshpande
Last Modified शनिवार, 12 डिसेंबर 2015 (14:35 IST)
एका पेक्षा जास्त बायका असलेला पुरूष आणि त्याची त्या सगळ्याजणींना सांभाळताना होणारी गोची, हा विषय आजपर्यंत आपण अनेक चित्रपटांतून पाहिलाय. त्यामुळे कॅरी ऑन देशपांडे ह्या विजय पाटकर दिग्दर्शित चित्रपटात
तुम्हांला पुन्हा एकदा तोच विषय पाहायला मिळतो. प्रेमकथा जेव्हा पडद्यावर सादर होतात. तेव्हा त्यातलं सादरीकरण हे दिग्दर्शकाचं कसब असतं. तसंच दोन किंवा त्यापेक्षा अधिक बायका सांभाळताना एखाद्या पुरूषाची होणारी त्रेधातिरपिट आणि त्यातून होणारी विनोदनिर्मिती ही गोष्ट सुध्दा जर सादरीकरणात नवेपणा ठेवला नाही तर कंटाळवाणी होऊ शकते, हे हा चित्रपट बनवताना ध्यानात ठेवणं आवश्यक होतं. त्याचप्रमाणे पुष्कर श्रोत्री हा चित्रपटाचा मुख्य हिरो म्हणून पाहणं असह्य असल्याचंही चित्रपट पाहिल्यावर कळतं. पुष्करमध्ये मानसी नाईकने भाळावं असा चार्म असल्याचं दिग्दर्शकाला का वाटलं असावं, ते दिग्दर्शकच जाणे. जाहिरात कंपनीत काम करणार्‍या आणि दोन-दोन लग्न केलेल्या शशी देशपांडेची ही कथा आहे. दोन बायकांना सांभाळताना उडणारी तारांबळ काय कमी असते. तर त्याच्या आयुष्यात मल्लिका येते. आणि मग शशी या तीन बायकांमध्ये कसा फसत जातो, त्याची ही कथा आहे.
>


यावर अधिक वाचा :

अमृताचा 'कानाला खडा'

national news
आयुष्यात चढ उतार हे येतंच असतात. त्याला प्रत्येकाला सामोरे जावे लागते. मात्र, उतारा ...

मातीचा देह मातीत मिसळण्यापूर्वी...

national news
निरंतर माळेतून एक मोती गळतो आहे, तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे .. काही चेहरे ...

मी शाहरुखला घाबरून राहायचे

national news
अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या आपला आगामी चित्रपट झिरोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी ...

झरीन खानच्या कारचा अपघात, बाइकस्वाराचा मृत्यू, अभिनेत्री ...

national news
बॉलीवूड अभिनेत्री झरीन खानच्या कारच्या गोव्यात अपघात झाला. तिच्या कार आणि बाइकमध्ये ...

रणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज !

national news
मराठीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगची खुप मोठी चाहती ...