testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सर्वसामान्यांच्या जगण्यातलं वास्तव ‘डबल सीट’

double seat
Last Modified मंगळवार, 18 ऑगस्ट 2015 (10:13 IST)
स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी लागणारं बळ कुठून आणायचं, तर त्याचं उत्तर मिळेल ते डबल सीटमधून.. समीर विद्वांस अन् क्षितिज पटवर्धन या दोन तरुणांचा हा सिनेमा एक नवी उमेद देणारा आहे. जगण्याचं भान अन् स्वप्नांच्या एक्सप्रेस वे वर धावण्यासाठीची ऊर्जा देणारा.. आशेचा किरण देणारा असा सिनेमा आहे.

मुंबईच्या मायानगरीत स्वत:चं हक्काचं घर असावं.. असं इथे येणार्‍या प्रत्येकाला वाटतं. केवळ छप्पर असावं, यापेक्षा मायानगरीत आपला जम बसवण्यामधली पहिली पायरी म्हणून याकडे पाहिलं जातं.. त्यापेक्षा अशाप्रकारचं स्वप्न ज्यावेळी पडतं.. त्यावेळी त्याच्या पूर्ततेसाठी जे काही करावं लागतं. त्या गोष्टीमधल्या अडथळ्यांच्या शर्यतीचा हा खेळ इथपर्यंतच हे सारं मर्यादित राहत नाही.. हे या डबल सीटचं शक्तिस्थान म्हणता येईल. जगण्यातला विरोधाभासावर नेमकेपणाने बोट ठेवणारी अशी ही आहे. आशेनिराशेच्या हिंदोळ्यावर असताना.. प्राक्तन अन् नियतीच्या खेळात होणारी फसवणूक अन् प्रत्यक्षात आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय.. याचा अंदाज घेत पावलं टाकत असताना त्या ऊनपावसाच्या खेळात ऐकट्याने लढण्यापेक्षा आपल्यासोबत खांद्याला खांदा लावणारं एखादं कोणी असणं किती गरजेचं आहे.

भार हलका होण्यासोबत पहिली लढाई हरली तर दुसरी लढाई जिंकण्यासाठीची उमेद जागवणं अन् ती आग चेतवत ठेवण्याची जी गरज असते ती आपल्या सुहृदानं करणं किती गरजेचं आहे, याचं भान हा सिनेमा आपल्याला देतो.


यावर अधिक वाचा :

शब्द अंतरीचे असतात.....

national news
शब्द अंतरीचे असतात दोष माञ जीभेला लागतो ॥ ठेच पायाला लागते ...

शांघायी आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात चित्रपट 'हिचकी'ची धूम

national news
शांघायी आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात अभिनेत्री रानी मुखर्जीची मुख्य भूमिका असणारे ...

आपुलकी असेल, तर जिवन सुंदर..

national news
आपुलकी असेल, तर जिवन सुंदर.. फुले असतील, तर बाग सुंदर...

जान्हवी कपूरला सर्वात कमी मानधन

national news
जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर स्टारर सिनेमा 'धडक' चा ट्रेलर रिलीज झालाय. मराठी सिनेमा ...

'भारत' साठी प्रियंकाने इतके घेतले मानधन

national news
सलमान खानच्या 'भारत' या सिनेमात प्रियंका चोप्रा दिसणार आहे. आता तिने 'भारत' या सिनेमासाठी ...