1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By
Last Modified: सोमवार, 13 जुलै 2015 (10:38 IST)

चित्रपट परीक्षण: मर्डर मेस्त्री- विनोदाचा वेगळा जॉनर

मर्डर मेस्त्री या नावामध्ये तशा अर्थाने गंमत आहे, मर्डर मिस्ट्रीचं मेस्त्री झालंय इथपासून ते या नावामधली मर्डरच्या मागील रहस्य समजावून घेताना या सिनेमातल्या विनोदाची जातकुळी वेगळी आहे. प्रभाकर सावंत म्हणजे हृषीकेश जोशी हा पोस्टमन आहे, लोकांची पत्रं चोरून वाचणं हा त्याचा छंद आहे. या छंदाने त्याच्यावर बर्‍याचदा बाका प्रसंगही ओढवला आहे, पण या नादातून त्याची सुटका झालेली नाही. या सगळ्या गोष्टीला एक वेगळं वळण मिळतं. ज्यावेळी त्याला एक असं पोस्टकार्ड गवसतं. ज्यामध्ये माधव मेस्त्रीला मारण्याची धमकी आहे.. अन् कोण माधव मेस्त्रींच्या जिवावर उठलंय अन् का.. हा प्रश्न आहे.. पण या सगळ्यामध्ये सावंतवाडीच्या पंचक्रोशीत तब्बल तीन माधव मेस्त्री आहेत. एक डॉक्टर माधव मेस्त्री म्हणजे दिलीप प्रभावळकर.. त्यांची पंचाहत्तरी जवळ आलीय अन् पत्नी मालिनी मेस्त्री म्हणजे वंदना गुप्ते.. लग्नानंतर रतीसुखाला आसुसलेला असा माधव मेस्त्री म्हणजे विकास कदम त्याची हॉट सिझलिंग पत्नी हेमलता म्हणजे मानसी नाईक अन् तिसरा माधव मेस्त्री म्हणजे गावचा माजी सरपंच असलेला संजय खापरे अन् त्याची पत्नी म्हणजे सरस्वती म्हणजे क्रांती रेडकर..या तिन्ही माधव मेस्त्रींच्या तीन तर्‍हा आहेत. त्यांच्या जगण्याचा फण्डा पण वेगळा आहे. 
 
डॉक्टर असणारे दिलीप प्रभावळकर तसे हेकट.. हट्टी अन् दुराग्रही त्यांच्या या हेकटपणामुळे त्यांची पत्नी असलेल्या वंदना गुप्तेंना त्यांना झेलावं लागतंय. विकास कदम तर हनीमूनला जायच्या तयारीत आहे अन् त्यामुळे तिथे गेल्यावर आपल्या मनासारखं घडावं अन् ते लवकरात लवकर घडावं, यासाठी त्याच्या जिवाचा आटापिटा सुरू आहे. या सगळ्यामध्ये दारूच्या अधीन झालेल्या सरपंचाला आपल्या बायकोच्या हातच्या खाण्याचं सुख त्याच्या नशिबी नाही, पण त्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळी प्रभाकर या तिघांच्या हातात त्यांची मर्डर होणार असल्याचं पत्र देतो.. त्यावेळी या मेस्त्रींची मर्डर होते का, काय नेमकं घडतं.. मर्डरच्या मिस्ट्रीमध्ये विनोद करण्याचा फंडा तशा अर्थाने मराठीत नवा वाटतो.