शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By
Last Modified: सोमवार, 24 नोव्हेंबर 2014 (14:32 IST)

‘मामाच्या गावाला जाऊया’ : चित्रपट परीक्षण

पंकज छल्लानी निर्मित ‘मामाच्या गावाला जाऊया’ हा बच्चे कंपनीचा उत्स्फूर्त अभिनय असलेला सिनेमा तुमच्या भेटीला आलाय. 
 
सिनेमाची कथा थोडक्यात सांगायची झाली तर नंदन देवकर म्हणजेच अभिजित खांडकेकर आणि त्याचे तीन भाचे यांची ही कथा आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर अनाथ झालेली ही बच्चेकंपनी आपल्या मामाचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडतात आणि अचानकपणे एका जंगलात हरवून बसतात. नंतर मग या जंगलात काय-काय नाटय़ घडतं हे पाहणं मनोरंजक ठरतं. 
 
मामाच्या गावाला जाऊयामध्ये अभिजित खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर चिंटू फेम शुभंकर अत्रे, साहील मालगे आणि आर्या भरगुडे या बच्चेकंपनीने सिनेमात धमाल आणलीये. अभिजित खांडकेकरचा हा खरंतर दुसराच सिनेमा आहे, मात्र पडद्यावरचा त्याचा हा अपिअरन्स चांगलाच भाव खाऊन जातो. गावाकडचा एक देखणा, राकट तरुण रंगवताना सिनेमातले भावुक क्षणही अभिजितने भूमिकेत शिरून, अत्यंत चपखलपणे रंगवलेत. त्यामुळे सिनेमातले डायलॉग असतील, नृत्य असेल, यामध्ये अभिजितने खर्‍या अर्थानं जान आणलीय. दुसरीकडे स्वत:ला नेहमी बुद्धिमान आणि तल्लख म्हणवणारा साहिल, फॅशनची आवड असणारी स्मार्ट गर्ल ईरा आणि या दोघांचा मोठा दादा कुणाल.. या त्रिकुटानं सिनेमातल्या भूमिका छान एन्जॉय केल्यात. तर मग हा सिनेमा का बघायचा हा प्रश्नही कदाचित तुम्हाला पडेल.. तर तो बघायचा अभिजित खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडेच्या उत्स्फूर्त अभिनयासाठी..त्यांच्यातल्या डायलॉगसाठी आणि बच्चेकंपनीची दे धम्माल एन्जॉय करण्यासाठी.. सो, घरातल्या बच्चेकंपनीला घेऊन एकदा ही फिल्म बघायला हरकत नाही.