गुरूवार, 16 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. मराठी कलावंत
Written By
Last Modified: पुणे , शनिवार, 28 फेब्रुवारी 2015 (12:39 IST)

अभिनेते अजय वढावकर यांचे निधन

लोकप्रिय अभिनेते अजय वढावकर यांनी 'नुक्कड' या लोकप्रिय मालिकेत गणपत हवालदाराची भूमिका साकारली होती, यांचे शुक्रवारी पुण्यात निधन झाले. काही वर्षांपूर्वी मधुमेहाच्या त्रासामुळे त्यांना आपला पाय गमवावा लागला होता आणि बरीच वर्ष ते कर्करोगानंही आजारी होते. अलीकडच्या काळात 'पवित्र रिश्ता'या मालिकेतून त्यांचे दर्शन घडले होते. 
 
रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणार्‍या अजय वढावकर यांना दूरदर्शनवरच्या तुफान गाजलेल्या 'नुक्कड' या मालिकेने घराघरात पोहोचवले होते. 
 
त्यात त्यांनी साकालेला गणपत हवालदार इता 'हिट' ठरला, की हवालदाराच्या अनेक भूमिका त्यांना 'ऑफर' झाल्या आणि त्या त्यांनी स्वीकारल्याही. हा हवालदार प्रेक्षकांना गालातल्या गालात हसवून गेला.