testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

उगवती गायिका

- नेहा राजपाल

neha
PRPR
हिरो होंडा प्रस्तुत 'सारेगामापा' संगीत स्पर्धेची २००४ सालची महाअंतिम फेरीची विजेती नेहा राजपाल आजच्या घडीला एक नामवंत पार्श्वगायिका म्हणून चित्रपटक्षेत्रात नाव कमवून आहे. आज तिच्या मेहनतीचं फळ म्हणून तिला झी गौरव पुरस्कारामध्ये मुक्काम पोस्ट लंडन' या चित्रपटातील गीतासाठी सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून तिला नामांकित करण्यात आलं आहे. नेहा राजपालला आज अवघा महाराष्ट्र ओळखतो तो तिच्या रामबंधू सहयाद्री अंताक्षरी या सहयाद्रीवरील लोकप्रिय कार्यक्रमाच्या मार्मिक सुत्रसंचालनामुळे. गेल्या वर्षभरात तिने या कार्यक्रमात रसिकांची मने जिंकून घेतली आहेत.

नेहाने एम.बी.बी.एसची पदवी संपादन केली आहे. पण तरीही तिचा ओढा गाण्याकडे ओढा आहे. तिचे वडील संगीतात पारंगत आहेत. शिवाय ते एक उत्तम गिटारवादक आहेत. त्यांनीच अगदी लहानपणापासून तिच्यात संगीताची आवड निर्माण केली. त्यामुळे संगीत तिच्या नसानसात भिनलं. लहानपणीच नेहाने की संगीतातंच करीयर करायचे ठरविले होते. तिचे हे स्वप्न सारेगामापाच्या विजेतेपदाने सत्यात उतरलं.

तिने किराणा घराण्यातील गुरू श्रीमती विभावरी बांधवकर यांच्याकडे शास्त्रोक्त संगीताचं शिक्षण घेतलं. सुप्रसिध्द संगीतकार अनिल मोहिले यांचाही आशीर्वाद तिला लाभला आहे. त्यांनी तिला रेकॉर्डिंग करताना नेमके कसे गायचे, त्यातले खाचखळगे व अचुकपणा याचं ज्ञान दिलं. त्यामुळे ती आज कोणत्याही प्रकारचं गाणं अगदी सहजतेने गाऊ शकते.

कोणतंही गाणं असो, शास्त्रीय, पॉप, सुगम संगीत किंवा लोकसंगीत नेहाचा गळा अगदी अचूक सूर पकडतो व श्रोत्याना भारावून टाकतो. त्यामुळेच गुणांमूळे लता मंगेशकर पुरस्कार सोहळयात नावाजलेल्या गायक - गायिकेच्या समवेत नेहालाही गाण्यासाठी खास पाचारण केलं. हा तिच्या आयुष्यातील सर्वांत मोठा बहुमान व स्मरणीय कार्यक्रम असं ती मानते. 'शुभमंगल सावधान' या चित्रपटातील गाण्यासाठी लता मंगेशकरबरोबर तिने गाणं रेकॉर्ड केले हाही तिच्या लेखी अविस्मरणीय क्षण. त्याचबरोबर तिने शंकर महादेवन यांच्याबरोबरही अनेक अविस्मरणीय मैफिली रंगवल्या आहेत. इतकंच नव्हे तर देश- परदेशातही तिने असंख्य गायनाचे कार्यक्रम यशस्वी केले आहेत व श्रोत्यांकडून वाहवा मिळविली आहे. तिला मिळालेल्या पुरस्कारांची यादीही मोठी आहे. यात सुरसंगम प्रतिष्टानचा पुरस्कार, सोनी टीव्हीवरील आदाब अर्ज है आणि अनिल मोहिले आदी नामांकित पुरस्कारांचा समावेश आहे.

वेबदुनिया|
- दीपक जाधव

नेहाच्या आतापर्यंतच्या गायनक्षेत्राचा आढावा घेतला तरी त्यात वैविध्य आढळतं. अगदी जिंगल, मालिका शीर्षक गीत, मराठी - हिंदी चित्रपट गीत व स्वतंत्र सोलो अल्बमपर्यंत तिचा प्रवास झाला आहे. नेहाने आपलं पहिलं गाणं अनिल मोहिले यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली -तुझ्याचसाठी' या चित्रपटासाठी गायिलं. त्यानंतर रामोजी राव यांचा 'चालू नवरा भोळी बायको', 'माणूस', 'लगीनघाई', 'माझं सौभाग्य' या मराठी चित्रपटासाठी व 'नयी पडोसन' या हिंदी चित्रपटासाठी आपला आवाज दिला. सोनी म्युझिकने तिचा 'ये जो मोहब्बत है' हा अल्बम निर्माण केला. मराठी चित्रपटांबरोबरच 'रामायण', 'सारा आकाश', 'भाभी', 'महाभारत', हेमा मालिनीची 'कामिनी दामिनी', 'कागज की कश्ती', 'नॉक नॉक कौन है' यासारख्या लोकप्रिय हिंदी मालिकांसाठी तिने आवाज दिला. तसेच 'बिर्ला व्हाईट सिमेंट', 'लेक्सी पेन' यासारख्या अनेक जाहिरातीतही नेहाने गायन केले आहे.


यावर अधिक वाचा :

येत्या १४ आणि १५ नोव्हेबरला दीपिका- रणवीरसिंहचे लग्न

national news
बॉलिवूडमधील लव्हबर्ड म्हणून ओळखली जाणारी दीपिका पदुकोण आणि रणवीरसिंह यांची जोडी अखेर 14 ...

‘बधाई हो’ची बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई

national news
नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली असून ...

हा अमिताभ बच्चन पण ना...

national news
हा अमिताभ बच्चन पण ना... वेगळाच माणुस आहे. आधी कोण बनेगा करोडपती मध्ये पैसे जिंकायला ...

शी, बाई, Ja too...

national news
मी गेलो, शेक हॅंड न करता हात जोडून नमस्ते केलं, गप्प बसून राहिलो, चहाचा कप पण डायरेक्ट ...

प्रेमी जोडप्यांच 'गॅटमॅट' जुळवून देतोय सिनेमाचे टीझर

national news
प्रेम तर दोघांच्या मनात आहे, पण ते व्यक्त आधी कोण करणार?... या प्रश्नांमध्येच अनेकांचा ...