रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

मानवापेक्षा वेगाने चालतो कबुतरांचा मेंदू

कबुतरांबाबत आपण जेवढा विचार करतो त्याहून ते कितीतरी जास्त समजदार असतात. कबुतरांमध्ये मानवापेक्षा कितीतरी जास्त प्रखर बुद्धी असते, असे एका ताज्या अध्ययनातून समोर आले आहे.
 
प्राचीन काळी कबुतरांचा संदेशवाहक म्हणून वापर केला जात होता. खरे म्हणजे टाइम आणि स्पेस मॅनेजमेंट ही त्यांची सगळ्यात मोठी खासियत आहे. बहुधा म्हणूनच त्यांचा संदेशवहनासाठी वापर केला जात होता.
 
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कबुतरांची स्मृती आश्चर्यकारक असते. एखादी वस्तू एकदा पाहिल्यानंतर ते विसरत नाहीत. त्यामुळे मानवी मेंदूपेक्षा जास्त गोष्टी ते लक्षात ठेवू शकतात. कबुतर आपल्या मेंदूत एखाद्या सामान्य व्यक्तीपेक्षा कितीतरी जास्त डाटा स्टोअर करु शकतात.
 
एका कबुतराला संगणकावर पहिल्या 2 ते 8 सेकंदांसाठी 6 ते 24 सेंटीमीटरपर्यंतच्या क्षितीज रेषा दाखविल्या. त्यानंतर कुबरांसमोर वेगवेगळी चिन्हे ठेवली. या प्रयोगात निर्णय घेण्यात कबुतरांनी सर्वात कमी वेळ घेतला. याचाच अर्थ असा की निर्णय घेण्यात कबुरत जास्त वेळ घेत नाहीत. असेही शास्त्रज्ञांना आढळून आले.