गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 2 डिसेंबर 2017 (17:15 IST)

कबुतराचा प्रश्न : महिला ग्रील सोबत पडली खाली तिचा मृत्यू

कबुतर घरात येवू नये म्हणून उपाय करयला गेलेली महिला ग्रील सोबत खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला. बेडरूमच्या खिडकीवरील ग्रिलमध्ये ही महिला उतरली आणि काम करत  होती. या महिलेचे नाव करूणा मोदी आहे. मुंबई येथील   कुर्ल्यातील नेहरू नगरच्या शिवसृष्टी सोसायटीमधील रामकृपा इमारतीत त्या राहत होत्या येथेच  घटना घडली आहे. हि महिला  इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने पडली आणि तिच्या डोक्याला  जबर मार लागला होता, मृत महिला करूणा (वय 57) पती विजय , मुलगी वैष्णवी यांच्च्या सोबात राहत होत्या. करूणा यांच्या पतीची एक खासगी कंपनी आहे. मुलगी नोकरी करते,  रामकृपा इमारतीत दोन रुमच्या घरात ते राहतात. विशेष म्हणजे खिडकीला दहा वर्षांपूर्वी 33 मिमीची ग्रिल बसवली. घटनेनंतर ही ग्रिल एका बाजूला झुकली. दहा वर्षापूर्वीची ही ग्रिल पूर्णपणे निकामी झाली असल्याचं यावरून समजतं आहे. त्यामुळे घरातील कामे करतात कृपया नागरिकांनी लक्ष दिले पाहिजे छोटी चूक ही आपला जीव घेऊ शकते असे उघड झाले आहे.