सिंह राशीच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो
तुम्ही रूबाबदार व्यक्तिमत्वाचे आणि राजा सारखे अधिकार गाजविणारे असता. जरी तुम्ही परीणामाचा विचार न करता समोरच्याला बोलून जात असले, तरी जबाबदारीची जाणीव ही तितकीच ठेवतात.
कट्टर राहूनही काम पूर्णत्वास नेण्याचे कौशल्य अंगी असते. हुकुमाने इतरांकडून काम करुन घेण्याची तुम्हाला सवय आहे. कर्क राशीसारखे भावनेवरती भर न देता कर्तव्यासाठी कठोर वागतात.
तुम्ही आपल्या तत्वांशी ठाम असतात. तत्व सोडत नाहीत, स्पष्टवक्तेपणा आणि कोणत्याही घटनेच्या संघर्षाच्या प्रसंगी तुम्ही दोन्ही बाजूंचा समतोल विचार करतात. तुम्ही राशी स्वभावाप्रमाणे रागीट असला तरी तुमचा राग म्हणजे ओढयाच्या पुरासारखा असतो, जितक्या झटकन येतो तितक्याच झटकन ओसरुन ही जातो. तुमच्यातील अहंकारी स्वभाव आणि स्पष्ट बोलण्याने तुमच्या सानिध्यातील माणसं तुमच्याकडून दुखावली जातात. तसे तुम्ही मनाने दिलदारही आहात, एखाद्याला सढळ हाताने मदत करण्याची वृत्ती ही असते.