शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016 (14:57 IST)

17 ऑक्टोबरला सूर्य तुला राशीत, 12 राशींवर त्याचा कसा प्रभाव राहील

सूर्य किमान 30 दिवस एका राशीत राहतो आणि वेग वेगळे फळ देतो. तर जाणून घेऊ सूर्याचे तुला राशीत प्रवेश केल्याने वेग वेगळ्या राश्यांवर त्याचे काय प्रभाव पडेल. खाली दिलेले फलादेश चंद्र राशीनुसार आहे.  
 
मेष
तुमच्यासाठी सूर्याचे राशीप्रवेश 7व्या घरात असेल. सूर्याच्या या स्थितीत तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत थोडे वैमनस्याचा भाव ठेवाल आणि त्यामुळे पारिवारिक शांती भंग होऊ शकते. कार्यक्षेत्रात काही नवीन होत दिसत नाही आहे म्हणून नवीन कामाला पुढे पुढे ढकलणे योग्य आहे. अतिरागाची स्थिती किंवा पूर्ण शांती या दोन्ही परिस्थिती तुम्हाला अडचणीत टाकू शकते म्हणून उदासीन भाव ठेवणे श्रेयस्कर राहील.  
 
वृषभ
तुमच्यासाठी सूर्याचे राशीप्रवेश सहाव्या घरात होईल. सूर्याच्या या स्थितीमुळे रोग आणि शत्रूंचे शमणं होईल. सूर्याच्या या स्थितीला ज्योतिषात लाभकारी म्हटले आहे. तुमचे शत्रू समोर येण्याचा साहस करणार नाही. वाहन दुर्घटनेची शंका असल्याने वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.   
 
मिथुन
तुमच्यासाठी सूर्याचे राशीत प्रवेश 5व्या घरात होणार आहे. सूर्याच्या या स्थितीमुळे पोटाशी निगडित रोग त्रास देऊ शकतात. जर तुम्ही  विचार करून आपल्या कार्यक्षेत्रात परिश्रम कराल तर नक्कीच यश मिळेल. तुमच्या मिळकतीत वाढ होण्याची शक्यता आहे.  
 
कर्क
तुमच्यासाठी सूर्याचे राशी प्रवेश चवथ्या घरात होत आहे. सूर्याच्या स्थितीमुळे परिवारात तणावपूर्ण वातावरण राहणार आहे. बॉस किंवा एखाद्या प्रभावशाली व्यक्तीकडून नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून कुठलेही व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या. 

सिंह
तुमच्यासाठी सूर्याचे राशी प्रवेश तिसर्‍या घरात होईल. सूर्याच्या या स्थितीला लाभदायक मानले जाईल आणि तुमच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल. नवीन कार्यांना तुम्ही योग्य दिशेत नेण्याचा प्रयत्न कराल आणि त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. या वेळेस तुम्ही तुमच्या लहान भाऊ आणि बहिणींसाठी काही केले तर उत्तम ठरेल.   
कन्या
तुमच्यासाठी सूर्याचा राशी प्रवेश दुसर्‍या घरात होईल. सूर्याच्या या स्थितीत तुमचे धन खर्च होण्याची शक्यता आहे म्हणून विचार करून कुठलेही खर्च करा आणि  एखादा मोठा खर्च करायचा असेल तर मोठ्यांचा सल्ला नक्की घ्या. कडू बोलणे  तुम्हाला अडचणीत टाकू शकतो म्हणून बोलताना मापून बोला.  
 
तूळ
तुमच्यासाठी सूर्याचा राशी प्रवेश लग्न अर्थात प्रथम स्थानात होत आहे. सूर्याच्या स्थितीमुळे तुमचा राग सामान्यापेक्षा थोडा जास्त राहणार आहे म्हणून आपल्या मनात शांती  धारण करा आणि लहान सहन गोष्टींवर क्रोध करू नका. तुमच्या जोडीदारासोबत गैरसमज होऊ शकतो म्हणून बोलण्यापेक्षा ऐकण्याचा प्रयत्न करा.  
 
वृश्चिक
तुमच्यासाठी सूर्याचा राशी प्रवेश 12व्या घरात राहील. सूर्याची ही स्थिती लाभकारी नसेल आणि तुमचे खर्च वाढू शकतात. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी करावी लागणार आहे आणि रक्तदाब सारखा आजार होण्याची शक्यता आहे. अधिकार्‍यांशी त्रास होऊ शकतो म्हणून सावधगिरी बाळगा.

धनू 
तुमच्यासाठी सूर्याचे राशी प्रवेश 11व्या घरात होईल. सूर्याची ही स्थिती तुम्हाला प्रतिस्पर्धेत यश मिळवून देईल. जर तुम्ही सरकारी परीक्षेत भाग घेत असाल तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या.  
मकर
तुमच्यासाठी सूर्याची राशी प्रवेश 10व्या घरात होईल. 10व्या घरात सूर्याला लाभकारी मानले आहे. सरकारी विभाग आणि अधिकारी वर्गाकडून फायदा होण्याची शक्यता आहे. ही वेळ तुमच्या वडिलांसाठी लाभकारी असेल आणि त्यांचा घरातील घरातील आनंदी वातावरणात बराच सहयोग मिळेल.  
 
कुंभ
तुमच्यासाठी सूर्याचे राशी प्रवेश नवव्या घरात होईल. ही वेळे तुमच्या वडिलांसाठी थोडी कष्टकारी जाणार आहे. आपल्या जोडीदाराचे लक्ष्य ठेवा आणि चुकीच्या गोष्टींवर वाद विवाद करू नये. एखाद्या धार्मिक यात्रेवर जाऊ शकता.  
 
मीन
तुमच्यासाठी सूर्याचे राशी प्रवेश 8व्या घरात होईल. ही वेळ तुम्हाला आणि तुमच्या वडिलांसाठी योग्य नाही आहे. अधिकारी वर्गाकडून त्रास होण्याची शक्यता आहे. कुठल्याही दस्तावेजावर विचार करून स्वाक्षरी करा.