शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : मंगळवार, 3 जानेवारी 2017 (12:55 IST)

जाणून घ्या कोणते ग्रह देतात तुम्हाला धोका

जन्मापासून 48 वर्षापर्यंत सर्व ग्रहांचे वयाच्या प्रत्येक वर्षात वेगवेगळा प्रभाव असतो. त्यात नऊ असे विशेष वर्ष असतात, जे ग्रहाशी संबंधित वर्ष मानण्यात आले आहे ज्यांच्यावर त्या ग्रहांचा शुभ किंवा अशुभ प्रभाव विशेष करून राहतो.   
 
लाल पुस्तकानुसार कोणता ग्रह वयाच्या कोणत्या वर्षात विशेष फल देतो याबाबत माहिती देत आहोत.   
1) गुरु :- सर्वप्रथम बृहस्पती ग्रहाचा प्रभाव आमच्या जीवनात राहतो. वयाचे 16वे वर्ष बृहस्पतीचे वर्ष मानले गेले आहे. हेच वय  मुलांचे बिघडण्याचे किंवा सुधारणाचे असतात. गुरू जर चवथ्या स्थानात स्थित असेल तर 16व्या वर्षात व्यक्ती शिक्षेच्या क्षेत्रात विशेष फायदा मिळवतो आणि जर सहाव्या भावात असेल तर नुकसान होण्याची शक्यता आहे.  
2) सूर्य :- सूर्य ग्रहाचा प्रभाव वयाच्या 22व्या वर्षात दिसून येतो. जर उच्चाचा असेल तर सरकारशी संबंधित कार्यांमध्ये पूर्ण लाभ मिळेल आणि अशुभ असेल तर सरकारी कार्यांमध्ये अडचणी निर्माण करतात.
 


चंद्र :- चंद्र ग्रहाचा प्रभाव वयाच्या 24व्या वर्षात दिसून येतो. उच्च किंवा शुभ स्थितित असल्याने आई आणि इतर सांसारिक सुखांची प्राप्ती होते. अशुभ किंवा नीचाचा असेलतर आईच्या बाबतीत विपरित परिणाम किंवा मानसिक तणाव वाढतो.  
 
4) शुक्र :- शुक्र ग्रहाचा प्रभाव वयाच्या 25व्या वर्षात विशेष दिसून येतो. शुक्राचे चांगले असल्याने बायको आणि सांसारिक सुखाची प्राप्ती होते. जर शुक्र नीचाचा असेल तर सुखांमध्ये अडचणी येतात.  
 

 मंगळ :- मंगळ ग्रहाचा प्रभाव वयाच्या 28व्या वर्षात दिसून येतो. मंगळाचे शुभ असल्यावर भाऊ, घर, जमिनीशी निगडित   कार्यांमध्ये लाभ मिळण्याचा योग आहे. जेव्हा अशुभ मंगळ असल्याने उपरोक्त विषयांमध्ये कमतरता येऊ शकते.

6) बुध :- बुध ग्रहाचा प्रभाव वयाच्या 34व्या वर्षात दिसून येते. जर शुभ असेल तर व्यापार इत्यादींमध्ये लाभ आणि अशुभ असल्यास नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.  
 
 7 ) शनी :- शनी ग्रहाचा प्रभाव वयाच्या 36व्या वर्षात दिसून येतो. जर शुभ असेल तर व्यवसाय आणि राजकारणात फायदा आणि अशुभ असल्यास नुकसान देतो.

8) राहू :- राहू ग्रह आपला प्रभाव वयाच्या 42व्या वर्षात प्रदान करतो. जर शुभ स्थितीत असेल तर राजकारणात विशेष लाभ, पण जर अशुभ असेल तर व्यक्ती षडयंत्राचा शिकार होऊन मानसिक तणावात राहतो.  
 
9) केतू :- केतू ग्रह आपला प्रभाव वयाच्या 42व्या वर्षात दाखवतो. जर शुभ असेल तर संतानं आणि मामाच्या संबंधांत विशेष लाभ आणि अशुभ असेल तर नुकसान.