Widgets Magazine

Guru : गुरु झाले मार्गी काय प्रभाव पडेल सर्व राशींवर

guru
शास्त्रांमध्ये भ्रमण करत असलेले कधी वक्री तर कधी मार्गी होतात. अशात सर्व राशींवर त्याचा प्रभाव पडतो. येणार्‍या महिन्याच्या
ज्येष्ठ पौर्णिमेला 9 जून रोजी संध्याकाळी 7.27 वाजता गुरु मार्गी होतील. पंचांगीय गणनेत पौर्णिमेच्या तिथीत गुरुचे मार्गी होणे शुभ संकेत आहे.

सध्या गुरु कन्या राशीत भ्रमण करून वक्री चालत आहे. असे मानले जाते की वक्री शुभ ग्रह जर इतर पाप ग्रहाशी दृष्टी संबंध ठेवतात तर तो
हानिकारक, प्राकृतिक परिवर्तन तथा बाजाराज नकारात्मक स्थिती बनवतो.


गुरुचे मार्गी झाल्याने जाणून घ्या 12 राशींवर त्याचा काय प्रभाव होईल ...

मेष राशीच्या जातकांना मागील काही दिवसांपासून येत असणार्‍या समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि अडकलेले धन प्राप्त होईल.

वृषभ राशीच्या जातकांसाठी हा बदल सुखकारी आहे, यामुळे कार्यक्षेत्रात प्रगती मिळेल. एखाद्या कार्याला करण्याअगोदर त्याची योजना बनवली तर लाभ मिळेल.

मिथुन राशीच्या जातकांसाठी हा बदल लाभकारी ठरणार आहे. जो जातक नवीन व्यापार सुरू करण्याचा विचार करत आहे त्यांचे कार्य सिद्ध होईल.
जर जन्मस्थानाच्या बाहेर काम कराल तर जास्त लाभ मिळेल.

कर्क राशीच्या जातकांसाठी हा बदल आध्यात्मिक रुची वाढवेल. जातकांचा भाग्योदय होईल.

सिंह राशीच्या जातकांसाठी हा बदल यात्रांचे योग घडवून आणत आहे. व्यवसायासाठी देश विदेशात यात्रा होण्याची शक्यता आहे.

कन्या राशीच्या जातकांसाठी हा बदल मानसिक शांती घेऊन येणार आहे. ज्या जातकांना आरोग्याची तक्रार असेल त्यांना नक्कीच आराम मिळेल.


तुला राशीच्या जातकांसाठी हा बदल प्रतिकूल आहे. संचित धनाचा नाश होईल. कर्ज घ्यावे लागतील.

वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा बदल ऐश्वर्य योग घेऊन आला आहे. या दिवसांमध्ये भूमी, भवन, वाहन इत्यादी विकत घेण्याचे योग बनत आहे.


धनू राशीच्या जातकांसाठी हा बदल राहत देणारा ठरणार आहे. बर्‍याच वेळेपासून सुरू असलेल्या अडचणींपासून आता मुक्ती मिळेल. एखाद्या मोठ्या काळजीपासून तुमची सुटका होईल.

मकर राशीच्या जातकांसाठी हा बदल भाग्योदय घेऊन आला आहे. एखाद्या मुश्कील कामात भाग्याचा साथ मिळेल, मोठी योजना यशस्वी होईल.

कुंभ राशीच्या जातकांसाठी हा बदल व्यावसायिक फायद्याचे योग घडवून आणत आहे. जर जातक व्यवसायात बदलीची योजना आखत असेल तर नक्कीच लाभ मिळेल.

मीन राशीच्या जातकांसाठी हा बदल मांगलिक कार्यांचे योग बनत आहे. मागील काही दिवसांपासून येणार्‍या अडचणी दूर होतील.


यावर अधिक वाचा :