मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (07:39 IST)

जाणून घ्या पुनर्वसू नक्षत्रात जन्म घेणारा बालकाचा स्वभाव!

ज्योतिष शास्त्रानुसार समस्त आकाश मंडळाला 27 भागात विभाजित करून प्रत्येक भागाचे नाव एक-एक नक्षत्रावर ठेवले आहे. प्रत्येक नक्षत्राचे चार भाग करण्यात आले आहे ज्याला चरण म्हणतात. अभिजित हा 28वां नक्षत्र म्हणून ओळखण्यात आले असून याचा स्वामी ब्रह्मा आहे. आता पुनर्वसू नक्षत्रात जन्म घेणारे बालक कसे असतात ते बघूया?

पुनर्वसू नक्षत्रात जन्म घेणारे बालक शांत, सुखी, सुशील, सुंदर, लोकप्रिय, धनी व बलवान, शास्त्राचे ज्ञान असणारे, दानी पुत्र असतात. मतांतरापासून असा जातक क्लेश सहन करणारा, बुद्धिहीन कामुक, रोगी आणि अल्पात संतुष्ट असणारा असतो.

पुनर्वसू नक्षत्रात जन्म घेणारे बालक न्यायप्रिय, दानी, परोपकारी, इमानदार, विश्वसनीय, क्षमायुक्त, सौंदर्याचा उपासक, वास्तविक व योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणारा, प्रभावशाली, तर्क प्रस्तुत करणारा, राजनीतीचे ज्ञान असणारा, नेतृत्व करण्याची क्षमता असणारा व भ्रमणप्रिय असतो.

पुनर्वसू नक्षत्राच्या पहिल्या तीन चरणांत जन्म झाल्यास राशी मिथुन, राशी स्वामी बुध व चवथ्या चरणात जन्म झाल्यास जन्म राशी कर्क तथा राशी स्वामी चंद्रमा, वर्ण शूद्र, वश्य प्रथम तीन चरणांमध्ये नर व अंतिम चरणात जलचर, योनी मार्जार, महावैर योनी मूषक, गण देव, नाडी आदी असते.