Laxmi Narayan Yog: मीन राशीत लक्ष्मी नारायण योग, या राशींना पैसा मिळेल
Budh Rashi Parivartan : वैदिक ज्योतिषप्रमाणे बुध ग्रहाचे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी राशी परिवर्तन झाले आहे. बुध मीन राशीत प्रवेश केल्याने दुर्लभ लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. अशात या 4 राशींच्या लोकांना धनलाभ होईल.
मीन राशीत लक्ष्मी नारायण योग
ज्योतिष शास्त्राप्रमाणे जेव्हा बुध मीन राशित प्रवेश केल्याने मीन राशीत सूर्य, शुक्र आणि राहु यासह बुधाची युति बनत आहे. याने लक्ष्मी नारायण योग, चतुर्ग्रही योग आणि बुधादित्य योग तयार होत आहे. यामुळे या चार राशींच्या लोकांना भरपूर पैसा आणि सुख समृद्धी मिळेल-
मिथुन- मीन राशीमध्ये लक्ष्मी नारायण योग तयार झाल्यामुळे मुलांकडून चांगली बातमी मिळेल. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. सत्ताधारी पक्षाचे सहकार्य मिळेल. त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी शुभ काळ आहे.
सिंह- धार्मिक कार्यात रुची वाढेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मोठे यश मिळेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. भौतिक सुखसोयी वाढतील. समाजात मान-सन्मान वाढेल.
कन्या- लक्ष्मी नारायण योगाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होईल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. मालमत्तेशी संबंधित वादातून आराम मिळेल. या काळात भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका.
धनु- लक्ष्मी नारायण योगाच्या प्रभावामुळे धनु राशीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळतील. धनु राशीच्या अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात. वैवाहिक जीवनात आनंद राहील. घरामध्ये शुभ कार्ये आयोजित करता येतील. उत्पन्नाच्या नवीन स्रोतातून पैसे मिळतील.