शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!
धन प्राप्तिसाठी, हनुमानाच्या कृपा प्राप्तिसाठी, शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठीपिंपळाच्या झाडाला अतिशय पवित्र मानले जाते. असे म्हणतात की, ज्याच्या घरी पिंपळाचे झाड असेल त्या घराला दारिद्र येत नाही आणि सुख-शांती तेथे वास करते. विज्ञानाने देखील पिंपळवृक्षाचे महत्त्व सांगितले आहे. आज आपण पहाणार आहोत पिपळवृक्षासंबंधीचे उपाय, ज्यातून अनेक समस्यांचे निदान केले जाऊ शकतात.
उपाय
शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी
शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठीही पिंपळवृक्षाची पूजा करणे फायद्याचे सांगितले गेले आहे. नियमाने पिपंळाच्या वृक्षाला जलाभिषेक केल्याने शनि दोषापासून मुक्ती मिळते, याने शनिदेवाची शांती होते. शनिवार संध्याकाळी पिंपळाच्या वृक्षाखाली दिवा लावावा.
धन प्राप्तिसाठी
पिंपळाच्या वृक्षाखाली शिव शंकराची प्रतिमा स्थापन करुन त्यावर दररोज जलाभिषेक करावा. नियमित पूजा करावी आणि ऊँ नमः शिवाय हा मंत्र जाप किमान ५ वेळा किंवा ११ वेळा करावा. त्यानंतर तुम्हाला स्वतःलाच त्याचा अनुभव येईल.
हनुमानाच्या कृपा प्राप्तिसाठी
हनुमानाची तुमच्यावर कृपा व्हावी असे वाटत असेल तर पिंपळवृक्षाची पुजा करावी. पिंपळाच्या वृक्षाखाली बसून हनुमानाची पूजा करावी त्यामुळे रामभक्त हनुमान प्रसन्न होतात अशी धारणा आहे. तसेच साधकाची मनोकामना पूर्ण होते.