शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: बुधवार, 24 मे 2017 (14:41 IST)

शनी जयंतीला मंगलादित्य योग, करा राशीनुसार हे उपाय

ज्येष्ठ महिन्याच्या अमावास्येला शनी जयंती साजरी केली जाते. यंदा ही जयंती 25 मे गुरुवारी येत असून त्या दिवशी मंगलादित्य समेत बरेच योगांचा संयोग बनत आहे, जे लोक शनीची साडेसाती आणि ढय्याशी प्रभावित असतील त्यांना विशेष लाभ मिळणार आहे.  
 
एवढे शुभ संयोग बनतील 
शनी जयंतीच्या दिवशी ग्रहानुसार मंगलादित्य समेत गुरुचे नवम-पंचम, शनीचा षडाष्टक व गुरु-शुक्राचे समसप्तक योग बनत आहे, ही जयंती तसे तर सर्व राशींसाठी फलदायी आहे, पण या योगात ज्यांना शनीची साडेसाती व ढय्या सुरू आहे त्यांच्यावर शनीची विशेष कृपा राहणार आहे.  
 
या राशींवर आहे शनीचा प्रभाव
वृषभ- ढय्या
कन्या- ढय्या
वृश्चिक- साडेसाती 
धनू - साडेसाती
मकर- साडेसाती  
 
शनी जयंतीवर राशीनुसार काय उपाय करावा, जाणून घ्या.....  
 
मेष राशी - सुंदरकांड किंवा हनुमान चालिसाचा पाठ करावा.  
वृषभ राशी - शनी अष्टोत्तर शत नामावलीचा पाठ करावा.  
मिथुन राशी - शनीला काळी उडीद चढवा.  
कर्क राशी - राजा दशरथ कृत शनी स्त्रोताचा पाठ करावा.  
सिंह राशी -  एखाद्या मंगळवारी हनुमानाला चोला चढवा.  
कन्या राशी - शनीदेवाच्या बीज मंत्रांचा जप करावा.  
तुला राशी - शनीदेवाचा अभिषेक सरसोच्या तेलाने करावा.  
वृश्चिक राशी - रोज सकाळी मुंग्यांना कणीक खाऊ घाला.  
धनू राशी - पिंपळाच्या झाडाखाली 11 दिवे लावा.  
मकर राशी - शनी देवाच्या वैदिक मंत्राचा जप करा.  
कुंभ राशी - ज्योतिषाच्या सल्लानुसार नीलम रत्न धारण करा.  
मीन राशी - कुष्ठ रोगींची यथाशक्ती मदत करा.