testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

2 नोव्हेंबर पासून वृश्चिक राशीत बुध, तुमच्यासाठी किती शुभ किती अशुभ

budh
बुध ज्ञान व व्यापारचा कारक ग्रह आहे. बुधाची उच्च राशी कन्या व नीच राशी
मीन आहे. बुधवार याचा वार आहे व गणपती याचे देवता आहे. रंग हिरवा, रत्न पन्ना व बुधाशी संबंधित तारीख 5, 14, 23 आहे. 2 नोव्हेंबरला बुध रात्री 1 वाजता वृश्चिक राशी, विशाखा नक्षत्रात प्रवेश करणार आहे व 24 नोव्हेंबर दुपारी
2 वाजेपर्यंत राहणार आहे. 12 राशींवर याचा प्रभाव कसा राहील हे जाणून घेऊ...

मेष- भावांपासून कष्ट, भागीदारीत नुकसान, शत्रू भय राहू शकतो. कर्ज घेण्याचे टाळा, आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. वार्तालाप करताना देखील सावधगिरी बाळगावी लागणार आहे.


वृषभ- प्रेमात यश, संतानशी लाभ, वाद विवाद स्पर्धेत यश मिळेल. दांपत्य जीवनात सुखद स्थिति राहील. दैनिक व्यापार व्यवसायात प्रगतीचे योग आहे. आरोग्याची काळजी घ्या. प्रभाव क्षेत्रात थोडी कमी जाणवेल.

मिथुन- कुठल्याही कार्यात परिश्रम केल्याने यश मिळेल. पारिवारिक प्रकरणात प्रतिकूल स्थिति राहील. मातृपक्षाचा सहयोग घेऊन चालावे लागणार आहे. बाहरी बाबींमध्ये सतर्कता ठेवावी लागेल. घेवाण देवाणमध्ये सावधगिरी बाळगा.


कर्क- बाहरी बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागणार आहे. प्रवास करताना सावधगिरी बाळगा. पराक्रम वाढेल, भाऊ आणि मित्रांचा साथ मिळेल. भागीदारीच्या बाबतीत थोडे जपून चालावे लागणार आहे. संतानकडून लाभ व मनोरंजनाच्या बाबींवर खर्च होईल.

सिंह- पारिवारिक कार्य बनतील, वाहनादि सुख मिळेल. धन संबंधित समस्यांचे समाधान मिळेल. वाणीचा प्रभाव वाढेल. आयच्या साधनांमध्ये वाढ होईल.
नोकरी करणार्‍यांनी आपल्या कामाप्रती सजग राहणे गरजेचे आहे. वडिलांच्या बाबतीत वाद-विवादापासून स्वत:चा बचाव केला पाहिजे.


कन्या- पराक्रम द्वारे तुम्ही तुमच्या कामांमध्ये यश मिळवाल. कुठल्याही प्रकारच्या निष्काळजीपण करू नये. व्यापार व्यवसायाची स्थिती स्वप्रयत्नांनी ठीक होईल. नोकरी करणार्‍यांसाठी वातावरण प्रगतिकारक ठरणार आहे. भाग्यात थोडी कमतरता येईल.

तुला- भाग्याचा साथ मिळाल्याने कार्यात सुधारणा होईल. वाणीचा प्रभाव वाढेल व कुटुंबीयांच्या सहयोग मिळाल्याने सुखद स्थिती राहील. यात्राचे योग जुळून येतील. बाहरी संबंधांमध्ये सुधारजनक स्थिति राहणार आहे. आरोग्य उत्तम राहील.


वृश्चिक- आरोग्याची काळजी घ्या. मेहनत अधिक केल्याने यश मिळेल. आर्थिक बाबींमध्ये थोडा त्रास संभवतो पण अडकलेले कामं पूर्ण होतील. दैनिक प्रारुपांमध्ये बदल करू नका. दांपत्य जीवन संमिश्र राहणार आहे.

धनू - व्यापार व्यवसायात सांभाळून चाला. नोकरी करणार्‍यांनी आपल्या कामात लक्ष घालावे. बाहरी प्रकरणांमध्ये आपल्या विवेकाचा वापर केल्याने समाधान मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कर्जाची स्थिती टाळा.


मकर- आर्थिक बाबींमध्ये थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. मुलांवर खर्च होईल.
लेखन संबंधित प्रकरणात सावधगिरी बाळगा. व्यर्थाची काळजी राहील. आर्थिक घेवाण देवाणपासून स्वत:चा बचाव करा व जोखिमीच्या कार्यांमध्ये अडकू नका.

कुंभ- व्यवसायात जोखिमीच्या कार्यांपासून स्वत:चा बचाव करा. पारिवारिक बाबींमध्ये समजूतदारीने काम करावे लागणार आहे. संपतीच्या बाबतीत विचार करून काम करा. संतानच्या बाबतीत खर्च होण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा.


मीन- भाग्याचा साथ मिळाल्याने दैनिक व्यवसायात यश मिळेल. दांपत्य जीवनात स्थिती सुखद राहणार आहे. पारिवारिक समस्यांचे समाधान मिळतील. जनतेशी निगडित काम होतील. परिश्रम जास्त करावा लागणार आहे. भावांचा साथ मिळेल.

बुधाचे वृश्चिक राशीवर असे पर्यंत जर कुठलीही समस्या आली तर गायीला हिरवा चारा खाऊ घाला, गणपतीला लाडवाचा प्रसाद द्या आणि बुधवारचा उपास ठेवा.


यावर अधिक वाचा :