testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मोदी यांचा 26 जानेवारी नंतर शुभ वेळ सुरू होईल

Last Modified शुक्रवार, 27 जानेवारी 2017 (14:13 IST)
भारताचे पंतप्रधान मोदी जेव्हापासून पंतप्रधान पदावर आले आहे, तेव्हापासून ते अपक्षाच्या निशाण्यांवर आहे. कधी केजरीवाल, कधी राहुल गांधी, कधी नोटबंदी तर, कधी सर्जिकल स्ट्राईक वर. आता यू.पी.,उत्तरांचल, मणीपूर, गोव्याच्या निवडणुकीत देखील मोदींवर निशाणा साधण्यात येत आहे.

कुठल्याही प्रकारे मोदींना त्रास होण्याची शक्यता दिसून येत आहे. तसे देखील त्यांना शनीची साडेसाती सुरू आहे. त्यांच्या पत्रिकेत शनी दहाव्या भावात असून वृश्चिक लग्नातून भ्रमण करत आहे तसेच मंगळ देखील विराजमान आहे. शनी मंगळाचा योग कुठल्याही भावात असला तरी हानिकारकच असतो.26 जानेवारी रात्री 8 वाजता शनी शत्रू वृश्चिक राशीला त्यागून गुरुच्या धनू राशीत प्रवेश करत आहे, तेव्हा कुठे शनीचा प्रकोप कमी होण्यास सुरू होईल आणि शुभतेत वाढ होईल. पत्रिकेनुसार शनी द्वितीय भावात भ्रमण करेल. येथून शनीची स्वदृष्टी आपल्या मूल त्रिकोणाची राशी कुंभावर पडेल, जे जनतेकडून मिळत असलेल्या प्रसिद्धीत वाढ करवून देईल आणि येणार्‍या निवडणुकीत त्याच्या प्रभाव दिसून येईल.

शनीची येथून सप्तम दृष्टी, अष्टम भावावर बुधाची मित्र राशीवर पडल्याने आरोग्य उत्तम राहील आणि गुप्त शत्रूंवर प्रभाव बघायला मिळेल. दशम दृष्टी तुमच्या द्वारे करण्यात आलेले आर्थिक सुधारांवर देखील अनुकूल आहे. आपल्यावर शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा लाभदायक सिद्ध होणार आहे.


यावर अधिक वाचा :