शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (00:17 IST)

12 भावांचे शुभ-अशुभ प्रश्न कुंडलीच्या माध्यमाने जाणून घ्या....

जेव्हा आपण प्रश्न कुंडली तयार करतो तेव्हा त्याच्या भावांवर विचार करणे जरूरी आहे. जन्म कुंडलीनुसार प्रश्न कुंडलीत देखील 12 भाव असतात आणि त्याच्या फळांचा विचार करून त्याचे निदान केले जातात. 
 
प्रथम भावाद्वारे वय, जाती, स्वास्थ्य, सुख-दुःख, शारीरिक बनावट इत्यादींचा विचार केला जातो. 
 
दुसऱ्या भावाद्वारे धन, परिवार, रत्नाभूषण, वाणी, स्मरण शक्ती, वस्त्र-उपहार, कल्पना शक्ती, दुसरा विवाह, खरेदी-विक्री आदींचा विचार करावा. 
 
तिसरा भावाने लहान भाऊ-बहीण, नोकर, शेजार पाजार, लेखन कार्य, पराक्रम, उजवा कान, जवळपासची यात्रा, स्थळ परिवर्तन इत्यादींचा विचार केला जातो.
 
चवथ्या भावामुळे बाग बगीचा, औषध, घर, वाहन सुख, आई, जमिनीत गाडलेले धन, मिथ्या आरोप, ज्ञान, शयन, सासरे आदींचा विचार केला जातो.
 
पाचव्या भावात संतानं, गर्भ, मंत्र, विद्या, बुद्धी, विवेक शक्ती, प्रबंध, गुरू, समाज, प्रेम, शासन इत्यादींवर विचार करण्यात येतो
 
सहाव्या भावाद्वारे रोग, भय, शत्रू, मामा, शंका, व्याधी, विघ्न, नोकरी, स्पर्धा, कर्ज, भागीदारीत मतभेद इत्यादींचा विचार केला जातो. 
 
सातव्या भावामुळे विवाह, स्त्री किंवा पती, प्रेम संबंध, हरवलेली वस्तू, व्यापार, देवाणघेवाण, वाद विवाद, शय्या सुख इत्यादींचा विचार केला जातो. 
 
आठव्या भावामुळे मरण, संकट, स्त्री का धन, वय विचार, शत्रूंपासून हानी, भांडण, सासर पक्ष, भूत बाधा, मानसिक अशांती, राज्य दंड, व्यसन इत्यादींवर विचार केला जातो. 
 
नवम भावात भाग्य, धर्म, तीर्थ यात्रा, गुरू, देवता, दीर्घ यात्रा, पुण्य कर्म, पिता, विदेश यात्रा, दान, उपासना, नातलग, दया भाव इत्यादींचा विचार केला जातो. 
 
दहाव्या भावात व्यवसाय, राज्यापासून लाभ-हानी, पद, प्रतिष्ठा, सासू, कार्य प्रणाली, ऑफिस, मान-प्रतिष्ठा इत्यादींचा विचार केला जातो. 
 
अकराव्या भावात अन्न, वस्त्र, मित्र, व्यापार, विद्या, मोठे भाऊ-बहीण, डावा कान, सासूचे धन, सून-जावई इत्यादींचा विचार केला जातो. 
 
बाराव्या भावात स्थान परिवर्तन, भोग, विवाद, दान, व्यय, उसने देणे, तुरुंग शिक्षा, कर्ज इत्यादींचा विचार केला जातो. 
 
शुभ ग्रह, शुभ फळ देतात आणि अशुभ ग्रह, अशुभ फळ देतात.