गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 17 डिसेंबर 2018 (14:29 IST)

मानेच्या आकारातून जाणून घ्या मनुष्याच्या स्वभावाबद्दल

सामुद्रिक शास्त्राची रचना ऋषी समुद्र यांनी केली होती. सामुद्रिक शास्त्रात व्यक्तीची शारीरिक बनावट, हाव-भाव आणि चिन्हांच्या आधारावर त्याच्या स्वभाव आणि भविष्याबद्दल सांगण्यात आले आहे. समुद्र शास्त्रानुसार मनुष्याच्या शरीरातील प्रत्येक अंग त्याचा स्वभाव आणि भविष्याबद्दल काही ना काही सांगतो. समुद्र शास्त्रानुसार, मान हे असे अंग आहे जे कुठल्याही व्यक्तीच्या स्वभावाला चांगल्या प्रकारे व्यक्त करतो. मान हे शरीरातील तो भाग आहे, ज्यावर डोक्याचा भार टिकलेला असतो. मस्तिष्कातून निघून सर्व अंगापर्यंत पोहोचणार्‍या नसा यातूनच जातात. तर जाणून घेऊ कशी मान असणार्‍या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो.  
 
लहान मान – सामान्यापेक्षा लहान असणार्‍या मानेचे लोक कमी बोलणारे, मेहनती व घमंडी असू शकतात. अशा व्यक्तींवर एकदम भरवसा करू नये.
 
जाड मान – ज्यांची मान सामान्यापेक्षा जाड असते, असे लोक क्रोध करणारे असतात. हे लोक थोडे स्वार्थी आणि घमंडी स्वभावाचे असतात.
 
सरळ मान – ज्या लोकांची मान सरळ असते, असे लोक स्वाभिमानी आणि आपल्या नियमांचे पक्के असतात. यांच्यावर तुम्ही विश्वास करू शकता.

लांब मान – सामान्यापेक्षा जास्त लांब असणार्‍या मानेचे लोक गप्पे मारणारे, मंदबुद्धी, अस्थिर, निराश आणि चापलूस स्वभावाचे असतात.
 
लहान मान – सामान्यापेक्षा लहान मानेचे लोक कमी बोलणारे, मेहनती, अविश्वसनीय व घमंडी असू शकतात.
 
उंटासारखी मान – पातळ आणि उंच मानेचे लोक सहनशील व मेहनती असतात. पण हे लोक धोकेबाज आणि स्वार्थी स्वभावाचे देखील असू शकतात.
 
आदर्श मान – अशा मानेचे लोक कला प्रेमी असतात. हे स्वभावाने सरळ असून आनंदी जीवन जगतात.