रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (10:57 IST)

नाग-नागिण जोडीचे 3 उपाय, दोष आणि आर्थिक अडचणी दूर होतील

1. काल सर्प दोष काढून टाकण्यासाठी उपाय: जर तुम्ही चांदीची नाग-नागिणीची जोडी आणू शकत नसाल तर एका मोठ्या दोरीमध्ये सात गाठी घालून नागचे स्वरुप तयार करा. नंतर ते एका आसनावर ठेवा आणि त्यावर कच्चं दूध, बताशा आणि फुले अर्पित करा. मग गुग्गलचा धूप द्या. या वेळी राहू आणि केतूचे मंत्र वाचा. राहूचा मंत्र 'ओम रहवे नमः' आणि केतूचा मंत्र 'ओम केतवे नम:' या मंत्रांचा समान संख्येने जप करा. यानंतर, भगवान शिवाचे ध्यान करताना, दोरीच्या गाठी एक एक करून उघडा. मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दोर वाहत्या पाण्यात फेकून द्या. यामुळे काल सर्प दोष दूर होईल.
 
2. सापाची भीती आणि वाईट स्वप्नांवर उपाय: दोन चांदीचे नाग आणि चांदीचं स्वस्तिक आणा. आता या नाग जोडीला एका ताम्हणात ठेवून त्यांची पूजा करा आणि दुसऱ्या ताम्हणात स्वस्तिक ठेवून त्यांची वेगळ्याने पूजा करा. नागांना कच्चं दूध अर्पित करा आणि स्वस्तिकावर बेलपत्र अर्पण करा. नंतर दोन्ही ताम्हण समोर ठेवा आणि 'ओम नागेंद्रहराय नम:' चा जप करा. यानंतर, नाग घेऊन शिवलिंगावर अर्पण करा आणि स्वस्तिक गळ्यात धारण करा. असे केल्याने सापाची भीती आणि स्वप्ने दूर होतात.
 
3. आर्थिक प्रगतीसाठी: नागपंचमीच्या दिवशी चांदीच्या नागाची जोडी एखाद्या विप्र किंवा मंदिरात दान करणे खूप शुभ मानले जाते. याने आपल्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि धन लाभ होण्याची शक्यता वाढेल.
 
नाग पूजा करण्यापूर्वी भगवान शंकराची पूजा केली जाते, त्यानंतर चांदीच्या नागांसह आठ नागांची मंत्रांसह पूजा करावी- 1. अनंत (शेष), 2. वासुकी, 3. तक्षका, 4. कर्कोटक 5. पद्म, 6. महापद्मा, 7. शंख आणि 8. कुलिक. नाग पूजेबरोबरच नाग माता कद्रू, मनसा देवी, बलरामची पत्नी रेवती, बलराम माता रोहिणी आणि सर्पोची आई सुरसा यांची पूजा करा.
 
नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शेण, गेरू किंवा चिकणमातीने नागाचा आकार तयार करा आणि त्याची पूजा करा. याने आर्थिक लाभ मिळेल आणि घरात येणारी संकटेही टळतील.