रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

या दोन राशीच्या जातकांना जन्मभर राहते पैशांची तंगी, करा हे उपाय

ज्योतिष शास्त्राचे मानले तर दोन रास अशा आहे ज्यांच्या जातकांना जन्मभर पैशांची तंगी राहते, येथे आम्ही या दोन राशींसाठी राशीनुसार बचाव करण्याचे उपाय सांगत आहोत .....
 
ज्योतिष शास्त्रानुसार दोन सर्वात गरीब रास  
ज्योतिष शास्त्रानुसार दोन राशीच्या जातकांना जन्मभर आर्थिक समस्यांशी लढावे लागते पण या सोबतच यांच्यापासून बचाव करण्याचे उपाय देखील सांगण्यात आले आहे. ह्या दोन रास आहे “मेष आणि वृश्चिक”.  
 
ज्योतिष शास्त्रानुसार मेष आणि वृश्चिक राशीचे जातक आर्थिक रूपेण जन्मभर कमजोर राहतात किंवा असे म्हणू शकतो की यांच्या भाग्यात धन सुख कमी असत. या समस्येला दूर करण्यासाठी आपल्या ईष्टदेवाचे स्मरण करत भक्ती भावाने नेमाने पूजा केली तर धनाबाबत येणारे संकटाचे समाधान होईल. त्याशिवाय राशीनुसार या दोन्ही राशीच्या लोकांना हे उपाय करायला पाहिजे....
 
मेष राशी
या राशीच्या जातकांनी संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर तेलाचा दिवा लावायला पाहिजे. अधिक फायदा मिळवण्यासाठी त्यात दोन काळे मिरे टाकावे. हा उपाय केल्याने लवकरच आर्थिक तंगी दूर होते. त्याशिवाय जर पैशांशी संबंधित एखादे प्रकरण अडकलेले असतील तर त्यात देखील फायदा होतो.   
 
वृश्चिक राशी
जर तुम्ही देखील पैशांच्या बाबतीत कुठल्याही समस्यांना तोंड देत असाल किंवा कर्ज घेऊन त्रासात अडकले असाल तर संध्याकाळी कुठल्याही विष्णू-लक्ष्मी मंदिरात एका पात्रात पाणी घेऊन जावे व ते पाणी नंतर पिंपळाच्या झाडाला अर्पित करावे. त्याशिवाय एखाद्या वड्याच्या झाडाचे पान घेऊन त्यावर कणकेचा दिवा लावून मारुतीच्या मंदिरात पाच मंगळवारी ठेवावे. या दोन्ही उपायांमुळे तुम्हाला आर्थिक त्रासांपासून मुक्ती मिळेल.