रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: गुरूवार, 29 एप्रिल 2021 (13:23 IST)

कोरोनाकाळात प्रिय व्यक्तीला निरोप : साथीच्या रोगामुळे दिवंगताच्या अंत्यसंस्काराबद्दल शास्त्र काय म्हणते?

आमच्या सनातन धर्मात षोडश संस्कारांचं विशेष महत्त्व असतं. जीवात्मा गर्भात प्रवेश करते तेव्हापासून ते देहत्याग केल्यापर्यंत सोळा प्रकाराचे विविध संस्कार पाळले जातात. सनातन धर्मानुसार सोळा संस्कार आवश्यक आहे परंतू देश-काळ-परिस्थिती यानुसार काही संस्कार वगळले आहेत. तरी या सोळा संस्कारांपैकी दोन महत्त्वाचेसंस्कार आहेत गर्भाधान आणि अंतिम संस्कार, कारण गर्भाधान संस्कार दरम्यान आम्ही गर्भात श्रेष्ठ आत्म्याचे आवाहान करतो व अंतिम संस्कारमध्ये त्या आत्म्याला विदाई देतो.
 
आमच्या शास्त्रांमध्ये या दोन्ही संस्कारांसह सर्व षोडश संस्कार करण्याची पूर्ण विधी उल्लेखित आहे ज्यानुसार आम्हाला यथावेळी संस्कार केले पाहिजे. वर्तमान काळात कोरोना साथीच्या आजार या समस्येशी झगडत आहे. या साथीच्या रोगाने वेळेपूर्वीच त्यांच्या प्रियजनांना दूर नेले आहे.
 
या साथीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डॉक्टरांद्वारे या आजारामुळे आपला जीव गमावून चुकलेल्या व्यक्तींचे अंतिम संस्कार करण्यासाठी देखील एक विशेष मार्ग सुचवला गेला आहे, ज्यात प्रियजनांना दाह- संस्कारापासून दूर ठेवले जाते. आज बर्‍याच शहरांमध्ये "लॉकडाउन" देखील स्थापित केले आहे, ज्यामुळे शेवटच्या संस्कारानंतरच्या कृती 
 
व्यवस्थित पूर्ण होत नाहीत. आमच्या शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीचा शेवटचा संस्कार संपूर्ण कायदा व सुव्यवस्थेने केला नसेल तर त्यांच्या आत्म्यास तारण मिळत नाही.
 
अशा परिस्थितीत मृतांच्या नातेवाईकांसमोर मोठी कोंडी आहे, शास्त्रानुसार त्यांच्या प्रियजनांना निरोप कसे द्यावे, जेणेकरून त्यांच्या आत्म्याचे तारण होईल. मित्रांनो, याला प्रभूची इच्छा व त्याचे विराट रुपाचे प्राकट्य म्हणा की या विषयावर लेखाद्वारे मार्गदर्शन करावं लागत आहे. प्रभूची इच्छा सर्वोंपरी हे स्वीकार कतर आज आम्ही वेबदुनियाच्या वाचकांना कोरोनामुळे दिवंगत झालेल्या व्यक्तीच्या अंतिम-संस्कारबद्दल त्यांच्या नातेवाईकांना काही शास्त्रोक्त माहिती पुरवत आहोत. 
 
आपल्या सर्वांना विदित आहे की या आजारामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या शेवटच्या संस्कारात, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दूर ठेवले जात आहे. तसंच उत्तर क्रिया सारख्या दशगात्र इतरासाठी देखील ब्राह्मण उपलब्ध होत नाहीये अशात त्यांचा श्राद्ध कशाप्रकारे करावे या संबंधात शास्त्रात स्पष्ट निर्देश आहे-
"श्रद्धया इदं श्राद्धम्" अर्थात् श्रद्धा हेच श्राद्ध आहे. आपण या नियमानुसार दिवंगत प्रियजनासाठी पूर्ण श्रद्धेने दहा किंवा तेरा दिवसांपर्यंत निम्न कार्य करावे-
 
1. शास्त्र वचन आहे- "तस्माच्छ्राद्धं नरो भक्त्या शाकैरपि यथाविधि" अर्थात् धनाभाव किंवा इतर परिस्थिती प्रतिकूल असल्यास दिवंगत व्यक्तीचे नातलंग केवळ शाक (हिरव्या भाज्या) च्या माध्यमातून श्राद्ध संपन्न करु शकतात. दहा किंवा तेरा दिवसापर्यंत दररोज कुतपकाळ (अपरान्ह 11:35 से 12:35) मधे गायीला शाक खाऊ घालत्याने श्राद्धची पूर्णता होते.
 
शाकच्या अनुपलब्धतेवर, विष्णू पुराणात दिलेल्या सूचनेप्रमाणे कुतपकाळात श्राद्धाकर्त्यांनी आकाशाकडे हात वर करून ही प्रार्थना करावी-" हे माझ्या प्रिये! श्रद्धाची अनुकूल परिस्थिती नाही परंतू माझ्‍याकडे आपल्या निमित्त श्रद्ध आणि भक्ती आहे. मी याद्वारे आपल्याला संतुष्ट करु इच्छितो आणि मी शास्त्राज्ञात आपले दोन्ही हात आकाशाकडे उंच केले आहे. आपण माझ्या श्राद्ध आणि भक्तीने तृप्त व्हावे."

2. दीपदान- दहा किवा तेरा (देश-काळ-लोक परम्परा अनुसार) दिवसांपर्यंत दक्षिण दिशेत आपल्या दिवंगत प्रियजनासाठी तीळाच्या तेलाचा दिवा लावावा. तिळाचं तेल उपलब्ध नसल्यास कोणत्याही तेलाचा दिवा लावावा.
 
नारायण बळी विधी-
उपर्युक्त वर्णित शास्त्रोक्त निर्देश आपत्ती काळासाठी त्वरित करण्यायोग्य कर्म आहे परंतू हे केल्याने विधिवत् अन्तिम-संस्कार न केल्यासंबंधी दोषाचे निवारण तोपर्यंत होत नाही जोपर्यंत या निमित्त "नारायणबळी कर्म" संपन्न होत नाही. कारण धर्मग्रंथानुसार ज्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले जात नाही असे सर्व "दुर्मरण" च्या श्रेणीत येतात आणि "दुर्मरण" व्यक्तींच्या निमित्ताने "नारायण बली" विधी केले जाणे अत्यंत आवश्यक असतं. धर्मग्रंथानुसार "नारायणबली" कर्म न केल्याने मृत आत्म्याला मोक्ष प्राप्त होत नाही.
 
"नारायणबळी" कर्म परिस्थिती सामान्य झाल्यावर कोणत्याही श्राद्धपक्षात संपन्न केलं जाऊ शकतं. जर "नारायणबळी" कर्म एखाद्या तीर्थक्षेत्र किंवा पवित्र नदीच्या काठी दिवंगत झाल्याच्या तीन वर्षाच्या आत संपन्न केलं जात असेल तर त्याच्या शुभतेमध्ये वाढ होते आणि दिवंगत व्यक्तीला सद्गति प्राप्त होते. म्हणून आमची वाचकांना विशेष विनंती आहे की ज्यांचे नातेवाईक देखील "कोरोना" साथीच्या आजाराने मरण पावले आहेत त्यांनी आपल्या सोयीप्रमाणे "नारायणबली" कर्म केलेच पाहिजे जेणेकरुन त्यांना मोक्ष मिळेल.
 
-ज्योतिर्विद् पं. हेमन्त रिछारिया
प्रारब्ध ज्योतिष परामर्श केन्द्र
सम्पर्क: [email protected]