गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

अशुभ आणि अमंगलकारी असतो स्त्रीच्या पत्रिकेतील विषकन्या योग

ज्योतिष शास्त्रात स्त्री जातकांसाठी काही विशेष योगांचे उल्लेख करण्यात आले आहे. अशात एक योग आहे 'विषकन्या योग'. हा योग फारच अशुभ असतो. या योगात जन्म घेणार्‍या कन्येला जीवनात फारच संघर्ष करावा लागतो. तिला दांपत्य व संतानं सुख प्राप्त होत नाही व तिचे कौटुंबिक जीवन देखील फारच दु:खद असत. जर स्त्रीच्या जन्मपत्रिकेत खाली दिलेल्या ग्रह स्थिती असतील तर तिच्या पत्रिकेत 'विषकन्या' योग बनतो.  
 
- शनी लग्नात अर्थात प्रथम भावात, सूर्य पंचम भावात व मंगळ नवम भावात स्थित असेल तर 'विषकन्या' योग बनतो.  
 
- जर स्त्रीचा जन्म रविवार, मंगळवार किंवा शनिवारी 2,7,12 तिथीच्या अंतर्गत आश्लेषा, शतभिषा, कृत्तिका नक्षत्रात झाला असेल तर विषकन्या योग बनेल.  
 
- जर स्त्रीच्या जन्मपत्रिकेत लग्न व केंद्रात पाप ग्रह असतील व समस्त शुभ ग्रह शत्रू क्षेत्री किंवा षष्ठ, अष्टम व द्वादश भावात असतील तरी देखील विषकन्या योग बनेल.  
 
विषकन्या योग कसा दूर होतो -
जर स्त्रीच्या जन्मपत्रिकेत विषकन्या योग असेल आणि सप्तमेश सप्तम भावात असेल तर हा योग लागत नाही.