कन्या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो
तुमचा इतरांपेक्षा वेगळा स्वभाव म्हणजे तुम्ही अत्यंत चिकित्सक आहात. काही पण होऊ दे, पण बुध्दी पणाला लावून प्रत्येक गोष्टीचा तुम्ही बारकाईने किस काढतात. अशामुळे काय होतय बुध्दीमान असूनही बुध्दीचा योग्य वेळी योग्य वापर केला जात नाही. बुध्दीचा वापर चुकीच्या पध्दतीने झल्यामुळे तुमच्या वरती पश्चाताप करण्याची वेळ येते.
तुम्ही खूपच प्रेमळ हळव्या स्वभावाचे नम्र सभ्य आहात. तरीही तुमचे कौटुंबिक जीवन मात्र फारसे समाधानी नसते. तुमच्या प्रेमामध्ये जिव्हाळा, उत्साह, भावनिकता असते. परंतु, तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला अपेक्षा ही उच्च असतात. आनंदी उत्साही असून तितकेच तुम्ही मुडी ही आहात.