शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: वॉशिंग्टन , मंगळवार, 18 नोव्हेंबर 2014 (12:12 IST)

गुरुवरील तांबड्या डागाचे अखेर उलगडले रहस्य

गुरू ग्रहावरील तांबड्या डागाचे रहस्य उलगडण्यात संशोधकांना यश आले आहे. हा डाग म्हणजे कोणत्या रसायनांचा परिणाम नसून तो सूर्यप्रकाशाचा परिणाम असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. 
 
नासाच्या कॅसिनी मोहिमेतून ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामध्ये असे दिसून आले आहे की, ग्रहाच्या वातावरणाच्या वरील स्तरात सूर्यप्रकाशाचे विघटन झाल्यामुळे विशिष्ट अशा साध्या रसायनांची निर्मिती होते. त्यामुळे हा तपकिरी-तांबड्या रंगाचा डाग दिसून येतो. यापूर्वीच्या हा डाग गुरुवरील ढगांखालील तांबड्या रसायनांमुळे दिसून येतो, असे संशोधकांनी पूर्वी म्हटले होते. मात्र, हे संशोधन आता मागे पडले आहे. नव्या संशोधनात गुरू ग्रहावर आढळणार्‍या अमोनिया आणि अॅसिटीलिन या वायुंबाबत एक प्रयोगही करून पाहण्यात आला. या वायूंचा अतीनील किरणांच्या प्रकाशात स्फोट घडवून आणण्यात आला. सूर्यप्रकाशाचा या वायूंवर जो परिणाम होतो तो यामधून पाहण्यात आला. त्यावेळी गुरू ग्रहावर दिसणार्‍या डागासारखाच तांबड्या रंगाचा घटक तयार झाला.