शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ग्रह-नक्षत्रे
Written By वेबदुनिया|

मंगळ ग्रहाची पूजा करताना लाल गुलाब का वाहतात?

WD
मंगळाची पूजा करताना काही भात म्हणजे तांदूळ, लाल गुलाल, कुंकू, लाल गुलाब ह्या सर्व वस्तू जरूरी असतात. असे मानले जाते की मंगळाला जर ह्या वस्तू अर्पित केल्या तर त्याचा व्यक्तींवर अनुकूल प्रभाव पडतो.

मंगळ अग्नी कारक ग्रह आहे. त्याचे स्वरूप लाल आहे. मंगळ लाल वस्त्र, लाल फूल इत्यादीने प्रसन्न होतो. जर एखाद्या राशीत मंगळ खराब जागेवर बसला असेल किंवा विपरित राशीत असेल तर व्यक्तीला मंगळाचा राग सहन करावा लागतो. मंगळ जर ठीक नसेल तर त्याला शीतल म्हणजे थंड प्रकृतीच्या वस्तू वाहिल्या पाहिजे. जसे भात, गुलाब, दही, दूध इत्यादी. गुलाब मंगळ ग्रहासाठी श्रेष्ठ फूल आहे.

हे फूल लाल रंगाचा असतो जे मंगळाच्या रंगाचे प्रतीक आहे आणि याची प्रकृती शीतल असते. गुलाबाचा रस आणि पाणी दोघेही मानव शरीराला गारवा प्रदान करतात. उन्हाळ्यात गुलाबाचे सरबत तयार करतो ते ही शरीराला शीतलता प्रदान करतो. मंगळ ग्रहाला लाल गुलाब वाहण्याने त्याच्या रंगाचा फायदा तर मिळतोच तसेच मंगळाचा क्रोधपण शांत होतो.